

-rat११p५.jpg-
२५N५०५४४
रत्नागिरी : बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सुजाता कोळंबेकर यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्कार प्रदान करताना प्रतिभा प्रभुदेसाई व प्रा. उदय बोडस आदी.
-------------
सुजाता कोळंबेकरांचा गौरव
पंचवीस वर्षे हस्तलिखान ; बोडस चॅरिटबल ट्रस्ट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : मोबाइल, टॅबसारख्या दुनियेत हस्तलेखनाची प्राचीन परंपरा मागे पडू लागली आहे. अशावेळी गेली २५ वर्षे आपल्या सुरेख हस्ताक्षराने जनसेवा ग्रंथालयाचे ‘शब्दांकूर’ हे दिवाळी हस्तलिखित लिहिणाऱ्या सुजाता कोळंबेकर यांना बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘कर्तव्यनिष्ठा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जागतिक महिलादिनी कोळंबेकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, रोख रक्कम, पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. त्या जनसेवा ग्रंथालयात कार्यरत असून, या ग्रंथालयाच्यावतीने गेली २५ वर्षे साकारण्यात येत असलेल्या ‘शब्दांकुर’ या हस्तलिखिताचे त्या एकटाकी लेखन करतात. या वेळी बोडस प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. उदय बोडस, खजिनदार आदिती पटवर्धन, जनसेवा ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष राहुल कुलकर्णी यांसह वैशाली लिमये, डॉ. शरद प्रभुदेसाई, नानीवडेकर, भाग्यश्री पटवर्धन, अमोल पालये आदी उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.