बुद्धिबळ स्पर्धेत सौरिश कशेळकर विजेता

बुद्धिबळ स्पर्धेत सौरिश कशेळकर विजेता

Published on

-rat११p१४.jpg-
२५N५०५७५
रत्नागिरी : जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त खेळाडूंसोबत सत्यशील सावंत.
------------
बुद्धिबळमध्ये सौरिश कशेळकर विजयी
वासुदेव सावंत स्मृती स्पर्धा ; साहसला उपविजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : येथील मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीतर्फे आयोजित (कै.) वासुदेव सावंत स्मृती २१ वर्षांखालील जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद रत्नागिरीच्या प्रथम मानांकित सौरिश कशेळकर याने पटकावले. चिपळूणच्या साहस नारकर याने अखेरच्या फेरीत द्वितीय मानांकित यश गोगटे विरुद्ध विजय संपादन करत उपविजेतेपद पटकावले.
चिपळूणच्याच श्रीहास नारकर याने सर्वेश दामले विरुद्धचा डाव जिंकत तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्विस लीग पद्धतीने सहा फेऱ्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेत सौरिशचे सहा तर साहसचे पाच व श्रीहासचे साडेचार गुण झाले. आयुष रायकर व यश गोगटे यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकावला तर आर्यन धुळप सहावा आला.
अनरेटेड खेळाडूंमध्ये अपूर्व बंडसोडे व मुलींमध्ये सई प्रभुदेसाईने प्रथम स्थान प्राप्त केले. १५ वर्षांखालील वयोगटात मंडणगडचा हर्ष चव्हाण, १३ वर्षांखालील वयोगटात अलिक गांगुली, ११ वर्षांखालील वयोगटात राघव पाध्ये, ९ वर्षांखालील वयोगटात विहंग सावंत व ७ वर्षे वयोगटात आरव निमकर यांनी प्रथम स्थान प्राप्त केले. प्रभुदेसाई हिला मागील क्लासिकल स्पर्धेत सर्वोत्तम डाव खेळल्याबद्दल विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. बक्षीस समारंभाला सत्यशील सावंत, फिडे मानांकित बुद्धिबळपटू सोहम रूमडे, वरद पेठे उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com