''सावली''तर्फे साळेलमध्ये ज्येष्ठ महिलांचा सत्कार
swt1125.jpg
50670
साळेलः येथे ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला.
‘सावली’तर्फे साळेलमध्ये
ज्येष्ठ महिलांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १२ : साळेल येथे सिंधुकन्या लोकसंचालित साधन केंद्र कट्टा तसेच स्वामी समर्थ ग्रामसेवा संघ साळेल आणि सावली फाउंडेशन साळेल यांच्यावतीने ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सिंधुकन्या साधन केंद्र कट्टाच्या शाखाधिकारी सौ. चौकेकर, माजी पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, सिंधुकन्या साधन केंद्र कट्टाच्या सहयोगी सौ. लंगोटे, स्वामी समर्थ ग्रामसंघाच्या अध्यक्ष विनिता गावडे, सचिव योगिता पडवळ, सीआरपी व ग्रामपंचायत सदस्य सिद्धी पवार, ग्रामपंचायत सदस्य संपदा गावडे उपस्थित होत्या.
सूत्रसंचालन सान्वी पोफळे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ महिलांचा सत्कार भेट वस्तू देऊन करण्यात आला. दिव्यांग बंधू-भगिनी यांनाही भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कमलाकर गावडे यांनी, महिलांसाठी शासनाच्या विविध योजना असून त्याचा लाभ घेऊन आपली उन्नती करावी, असे आवाहन केले. यावेळी साळेल गावातील महिला उपस्थित होत्या. महिलांचे विविध खेळ तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. स्वामी समर्थ ग्रामसंघाच्या अध्यक्ष विनिता गावडे यांनी उपस्थित मान्यवर तसेच महिलांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

