राजापूर आगाराला चार बस
राजापूर आगाराला
चार नवीन बस
राजापूर ः आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्यातून राजापूर आगाराला प्राप्त झालेल्या चार नवीन बसचे लोकार्पण आमदार किरण सामंत, रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, यंत्र अभियंता अनंत कुलकर्णी, विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद यादव, राजापूरचे आगार व्यवस्थापक अजितकुमार गोरसाळे, साहाय्यक कार्यशाळा अधीक्षक प्रकाश झोरे, आगार लेखाकार सुबोध बाकाळकर आदी उपस्थित होते.
--
मिठगवाणेत ज्येष्ठांचे
स्नेहसंमेलन
राजापूर ः तालुक्यातील मिठगवाणे येथील पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलन श्री देव अंजनेश्वर देवस्थान सभागृहामध्ये झाले. या वेळी आमदार किरण सामंत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास चेऊलकर, ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर, रत्नागिरी कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारूती आंब्रे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास चाळके आदी उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती सावित्री कणेरी आणि प्राजक्ता मराठे यांनी दिली. वस्त्रहरणकार गंगाराम गव्हाणकर यांनी आपल्या व्हाया वस्त्रहरण या आत्मचरित्रातील किस्से सांगितले.
---
‘महसूल संघटना’
सचिवपदी आंबोळकर
राजापूर ः रत्नागिरी जिल्हा महसूल सेवक संघटनेची बैठक झाली. या बैठकीमध्ये राजापूरचे महसूल सेवक आनंद आंबोळकर यांची रत्नागिरी जिल्हा महसूल सेवक संघटनेच्या जिल्हा सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आंबोळकर हे राजापूर तालुक्याचे मुख्यालयात २००९ पासून महसूल सेवक (कोतवाल) म्हणून कार्यरत आहेत. सन २०१६ ते १९ या कालावधीत राजापूर तालुका कोतवाल संघटनेच्या खजिनदारपदी कार्यरत होते. २०१९ ते २१ व सन २०२१ ते २३ या कालावधीत ते अनुक्रमे रत्नागिरी जिल्हा कोतवाल संघटनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख व जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

