खेडमध्ये पाणीपट्टी वसुलीचे काम वेगाने
खेडमध्ये पाणीपट्टी वसुली जोरात
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १२ : नगरपालिकेने जानेवारी महिन्यातच थकित पाणीपट्टीधारकांना दणका देण्यास सुरवात केल्यानंतर कारवाईचा धसका घेतलेल्या अनेक थकितदारांनी कराची रक्कम भरण्यासाठी पुढाकार घेतला. पालिकेचे अधिकारी, कर्मचारी पाणीपट्टीसह मालमत्ता कराची वसुली करण्यात गुंतले आहेत. मार्चअखेरपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार नगर प्रशासनाने केला आहे.
मुख्याधिकारी महादेव रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या पाणी विभागातील पथकाने जानेवारी महिन्यातच थकित पाणीपट्टी थकबाकीदारांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली होती. ६०हून अधिक थकित पाणीपट्टीधारकांचा पाणीपुरवठाही खंडित केला होता. या कारवाईनंतर थकितदारांनी नगर पालिकेत पाणीपट्टी भरणा करण्यास सुरवात केली होती. पथकाने कारवाईची मोहीम तीव्र केल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

