रूपांतरित कर्जावरील व्याजाचा २९७ शेतकऱ्यांना लाभ

रूपांतरित कर्जावरील व्याजाचा २९७ शेतकऱ्यांना लाभ

Published on

रुपांतरित कर्जाच्या व्याजाचा शेतकऱ्यांना लाभ
२ कोटी २२ लाख बँकेत जमा ; १८० कर्जदारांची पडताळणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता १२ ः फेब्रुवारी व मार्च २०१४ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे त्रस्त शेतकऱ्यांना रूपांतरित कर्जावर (पुनर्गठीत) २०१४-१६ या वर्षाचे संपूर्ण व्याज आणि पुढील चार वर्षाची व्याजमाफी सहा टक्के दराने देण्याचा निर्णय शासनाने २०२४ मधील विधानसभा निवडणुकांपूर्वी घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २९७ शेतकऱ्यांना २ कोटी २२ लाख २३ हजार ५९५ रुपये मिळाले आहेत.
शासनाच्या १२ जानेवारी २०२४ च्या निर्णायानुसार २०१४-१५ या वर्षातील पिककर्जाचे पुनर्गठन झालेल्या संपूर्ण व्याज पुढील चार वर्षावरील ६ टक्के दराने होणारी व्याजमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या योजनेंतर्गत ४७७ शेतकऱ्यांसाठी सात कोटी ७५ लाख ६ हजार ३३३ रुपये मिळावेत असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाला सादर करण्यात आला होता. त्यापैकी पात्र २९७ शेतकऱ्यांना २ कोटी २२ लाख २३ हजार ५९५ रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित १८० लाभार्थ्यांची फेरतपासणी जिल्हा विशेष लेखा परीक्षकांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना ही रक्कम दिली जाईल. जिल्ह्यातील ४७७ कर्जदारांपैकी २०१४-१५ या वर्षातील पुनर्गठन झालेल्या २९७ जणांना २ कोटी २२ लाख २३ हजार एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे. उर्वरित १८० जणांना ५ कोटी ५२ लाखएवढी रक्कम अद्याप मिळालेली नाही. या खातेदारांची जिल्हा विशेष लेखा परीक्षकांकडून पडताळणी झाल्यानंतर ही रक्कम मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, विदर्भ कोकण ग्रामीण बॅक, सेंट्रल कोकण ग्रामीण बॅंक, युनियन बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकांतून शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. सरकारने लोकसभा-विधानसभा निवडणुकांपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ४७७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून पाठवण्यात आले होते त्यापैकी २९७ जणांना लाभ मिळाला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com