क्राईम

क्राईम

Published on

टपरीवर तंबाखूजन्य
पदार्थाची विक्री
रत्नागिरी ः कोळंबे (ता. संगमेश्वर) येथे शाळेच्या शंभर यार्डमधील पानटपरीत तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्याविरूद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश नामदेव चव्हाण (४०, कोळंबे, चव्हाणवाडी, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १०) सायंकाळी कोळंबे येथील हायस्कूल आणि महाविद्यालयाच्या शंभर यार्डच्या पानपटीत निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने शाळेच्या शंभर यार्डमधील पानटपरीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली. या कारवाईत पोलिसांनी पंचासमक्ष १८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल राहुल खरपे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
---
एसटी-दुचाकीच्या
अपघातात एक जखमी
रत्नागिरी ः शहरातील चर्मालय येथे एसटी आणि दुचाकी यांच्यामध्ये अपघात झाला. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला. राहुल सुरेश तेरवणकर (वय ३६, रा कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ११) सकाळी साडेआठच्या सुमारास चर्मालय येथे घडली. कोकणनगरहून मारूती मंदिरच्या दिशेने येणाऱ्या सिटी बस येत होती. त्याचवेळी दुचाकीस्वार चंपक मैदान येथून साळवी स्टॉपच्या दिशेने जात होता त्या वेळी हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याच्या हातापायाला मार लागला तर दुचाकीचे नुकसान झाले. उपचारासाठी स्वाराला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com