‘सह्याद्री’तर्फे शनिवारपासून सावंतवाडीत नाट्य महोत्सव

‘सह्याद्री’तर्फे शनिवारपासून 
सावंतवाडीत नाट्य महोत्सव
Published on

50820

‘सह्याद्री’तर्फे शनिवारपासून
सावंतवाडीत नाट्य महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री फाउंडेशन व संजू परब मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १७ मार्च कालावधीत तीन दिवसीय नाट्यमहोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये दोन ट्रिकसीनयुक्त व एक ऐतिहासिक नाट्यप्रयोग होणार आहे. शहरातील भोसले उद्यान समोर हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संजू परब यांनी आज येथे दिली.
श्री. नाईक यांनी आज आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, तालुकाध्यक्ष रवींद्र मडगावकर, प्रल्हाद तावडे, नंदू शिरोडकर, प्रताप परब, मोहिनी मडगावकर, विनोद सावंत उपस्थित होते. परब म्हणाले, ‘‘आमदार राणे यांचा वाढदिवस १५ ते १७ मार्च कालावधीत विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यामध्ये गरजूंना धान्यवाटप, रुग्णांना फळे, औषध वाटप तसेच रुग्णालयात बेडशीट वाटप आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. रोज सायंकाळी ७ वाजता शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती उद्यान येथे नाट्यप्रयोग होणार आहेत. यामध्ये १५ ला कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुळ यांचा ‘जय जय रवळनाथ’, १६ ला जय हनुमान दशावतार नाट्यमंडळाचा ‘कृष्णभक्त कुम्मनदास’ असे दोन ट्रिकसीनयुक्त, तर १७ ला गणेश ठाकूर दिग्दर्शित अफजलखानाच्या वधावर आधारित ‘नरसिंह शिवराय’ हा रोमहर्षक ऐतिहासिक नाट्यप्रयोग होणार आहे. या विविध कार्यक्रमांचा व नाट्याकृतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com