बांदा येथे ५३७ जणांची चिकित्सा
50821
बांदा येथे ५३७ जणांची चिकित्सा
‘श्री शिवप्रतिष्ठान’चा उपक्रमः रुग्णांच्या तपासणीसह मोफत औषधे
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १२ः हिंदू एकता मंच बांदा, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ-गोवा व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला परिसरातील रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात तब्बल ५३७ रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मोफत औषध पुरवठा करण्यात आला.
या शिबिरात हृदयरोग, उच्चरक्तदाब, ऍलर्जी व दमा, श्वसन विकार, पक्षाघात, नेत्र विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, वातविकार, मधुमेह, बालरोग, मुळव्याध, पचन, कान-नाक-घसा, स्त्रीरोग, थायरॉईड, गुप्तरोग व अन्य जुनाट विकारांवर उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. शिबिरात सर्व वयोगटातील रुग्णांची तपासणी मोफत करण्यात आली. यात डॉ. दीपा शिरोडकर, डॉ. सायली कासार, डॉ. सरिता कापगले, डॉ. प्रशांत ससाणे, डॉ. अभिषेक तिवारी, डॉ. स्वप्नील औटी, डॉ. शुभम ओगले यांचा समावेश होता.
बांदा व्यापारी संघाच्या विठ्ठल रखुमाई सभागृहात आयोजित शिबिराचे उद्घाटन सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते झाले. शिबिर आयोजनाबद्दल सामाजिक कार्यकर्ते गुरू कल्याणकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा मराठा समाज अध्यक्ष विराज परब, नीलेश सावंत, मंगेश पाटील, हेमंत दाभोलकर, संदेश पावसकर, वीरेंद्र आठलेकर, मंदार केसरकर, नीलेश कदम, म. गो. सावंत, गुरुनाथ नार्वेकर, ऋग्वेद कल्याणकर, शुभम केसरकर, व्यंकटेश ऊरुमकर, प्रकाश गवस, अमित कुडतरकर, नंदादीप केळुसकर, जान्हवी सावंत, श्वेता वराडकर तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमास माजी जिल्हा आरोग्य सभापती प्रमोद कामत, बांदा व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर यांनी सहकार्य केले. आभार वीरेंद्र आठलेकर यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

