

50819
वाहतूकदारांच्या समस्यांवर
पालकमंत्री राणेंशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघ नूतन अध्यक्ष प्रकाश गवळी (सावकार) यांनी बंदर विकास तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांची ओरोस येथे भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या भेटीत वाहतूकदारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
सरकारच्या सीमा तपासणी नाके बंद करण्याच्या निर्णयाचे महासंघाने अभिनंदन केले. यावेळी एआयएमटीसी संचालक बाळासाहेब कलशेट्टी, प्रकाश केसरकर, भाऊसाहेब घोगळे, पंडितराव कोरगावकर, कैलाश पिंगळे, बाळासाहेब कटके, पराग जोग, मनोज वालावलकर, शिवाजी घोगळे, आनंद वालावलकर, अनुपसेन सावंत, संदीप पेडणेकर (वेंगुर्ले), शेखर मुणगेकर (मालवण), विशाल सावंत (सावंतवाडी), भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
........................
50822
सांस्कृतिक कार्यक्रमांना
सावंतवाडीत प्रतिसाद
सावंतवाडी, ता. १२ ः येथील सर्वोदयनगर महिला संघाच्या वतीने आगळ्या वेगळ्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक प्रदर्शन आणि महिलांच्या विशेष सन्मानाचा समावेश होता. महिलांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशानेच या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजिका शीतल गोंदावळे, सर्वोदयनगर महिला संघ अध्यक्षा दिशा कामत, सचिव मेघना राऊळ, सर्वोदयनगर रहिवासी संघ अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील राऊळ, ज्येष्ठ महिला यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी उपस्थित सुनील राऊळ, शीतल गोंदावळे, दिशा कामत, मेघना राऊळ यांनी महिला वर्गाला मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.