वेंगुर्लेत पथनाट्यातून विविध योजनांचे धडे

वेंगुर्लेत पथनाट्यातून
विविध योजनांचे धडे
Published on

वेंगुर्लेत पथनाट्यातून
विविध योजनांचे धडे
वेंगुर्ले ः बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील महिला विकास कक्ष आणि जिल्हा महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी महिला व बालविकास विभागातील योजनांवर आधारित पथनाट्य नुकतेच सादर करण्यात आले. महिला व बालविकास विभाग, कुडाळ शाखेमार्फत संरक्षण अधिकारी मिलिंद कांबळे, सहायक संरक्षण अधिकारी अक्षय कानविंदे, प्रा. वामन गावडे, महिला विकास कक्ष चेअरमन डॉ. मनीषा मुजुमदार उपस्थित होत्या. महिला दिन कार्यक्रमांतर्गत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या पथनाट्याच्या माध्यमातून विभागामार्फत महिलांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि योजनांची माहिती जनमानसांत देण्याचा उद्देश असल्याचे मिलिंद कांबळे यांनी सांगितले. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या घोषवाक्याला अनुसरून ‘स्त्रीभ्रूणहत्या करू नका’ असा संदेश देणारे पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात शर्मिष्ठा सामंत, अंगणवाडी सेविका नेत्रा होडावडेकर, समीक्षा येरम, प्रतिमा जाधव, चंद्रकांता पेडणेकर, गौतमी पेडणेकर, प्राची वाघे, माधुरी वाघे आणि सुप्रिया गावडे यांचा सहभाग होता. प्रा. जे. वाय. नाईक यांनी आभार मानले.
.....................
वस्तू प्रदर्शनास
नेमळेत प्रतिसाद
सावंतवाडी ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिवप्रतिष्ठान, कामळेवीर यांच्यातर्फे स्वामी समर्थ मंगल कार्यालय, नेमळे पोकळेनगर येथे शिवप्रेमी महेश राऊळ यांनी शिवकालीन वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजित केले. या प्रदर्शनात शिवकालीन नाणी भांडी, मोडी लिपीतील पत्रे, गड-किल्ल्यांची छायाचित्रे व प्राचीन वस्तू ठेवल्या होत्या. या शिवकालीन वस्तू प्रदर्शनाला नेमळे पंचक्रोशीतील दोन हजारांहून अधिक शिवप्रेमी, वीस प्राथमिक, तसेच माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
......................
फोंडाघाटला मेमध्ये
‘उपनयन संस्कार’
कणकवली ः कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ, कणकवलीतर्फे तालुक्यातील कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाजातील बटूंचा उपनयन संस्कार कार्यक्रम २ मे रोजी फोंडाघाट येथील संस्थेच्या पूर्णानंद भवन येथे आयोजित केला आहे. या ज्ञातीतील ज्या बटूंच्या मौजी या कार्यक्रमात करायच्या आहेत, त्यांच्या पालकांनी बटूंची नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी राजू गवाणकर, रामचंद्र बावकर, राजेश आजगावकर व अरुण सामंत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे कार्यवाह अ‍ॅड. एन. आर. देसाई यांनी केले. बटूंची नोंदणी २१ एप्रिलपर्यंत करायची आहे.
....................
पाडलोसला १५ पासून
क्रिकेट प्रीमियर लीग
सावंतवाडी ः पाडलोस केणीवाडा येथील देव राष्ट्रोळी कला, क्रीडा मंडळ आयोजित देव राम मंदिर मैदानाजवळ १५ व १६ मार्चला केणीवाडा प्रीमियर लीग आयोजित केली आहे. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास ३१००१, द्वितीय २१००० व प्रत्येकी चषक देण्यात येईल. इच्छुक संघांनी दाजी नाईक व अमोल नाईक यांच्याशी नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
....................
मसुरेत १५ पासून
ओव्हरआर्म क्रिकेट
मसुरे ः बाजारपेठ मित्रमंडळ, विरण आयोजित ‘एक गाव-एक संघ’ ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा १५ ते १७ मार्च दरम्यान वाडकर मैदान बाजारपेठ, विरण येथे आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २१००० व चषक, द्वितीय ११००० व चषक, तृतीय ३००० व चषक, चतुर्थ २००० व चषक तसेच मालिकावीर, वैयक्तिक बक्षिसे आहेत. अधिक माहिती व प्रवेशासाठी यश पांजरी व सिद्धेश माड्ये यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com