

rat११p११.jpg-
P२५N५०५६०
रत्नागिरी ः मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या भैय्याजी जोशी यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी.
---
भैय्याजी जोशी यांच्यावर कारवाई करा
ठाकरे शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : राष्ट्रीय स्वयंसंघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी राज्याच्या राजधानीत म्हणजे मुंबईत येऊन मराठी भाषेबद्दल अत्यंत बेजबाबदारपणे बोलले. मराठी भाषा आणि मराठी जनांबद्दल अवमानकारक बोलून महाराष्ट्राचा अपमान केला. हा अपमान संपूर्ण महाराष्ट्राचा आणि मराठी अस्मितेचा आहे. त्याबद्दल आमच्या तीव्र भावनेतून आम्ही त्यांचा निषेध करतो. हा अवमान केल्याबद्दल शासनाने जोशी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने मराठी भाषिकांच्या भावनांचा आदर राखून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला. त्याबद्दल आम्ही यापूर्वी अनेकदा केंद्र शासन आणि राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. याबाबत संपूर्ण महाराष्ट्र आनंदोत्सव साजरा करत असतानाच त्या आनंदावर विरजण घालण्याचे पाप काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसंघाचे माजी सरकार्यवाह जोशी यांनी केले. आम्ही त्याचा तीव्र भावनेने निषेध व्यक्त करून जोशी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत आहे.
या वेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, विभागप्रमुख सलिल डाफळे, अमित खडसोडे, प्रशांत सुर्वे, उपविभागप्रमुख दिलावर गोदड, माजी नगरसेविका रशिदा गोदड, साजिद पावसकर, हिना दळवी, नितीन तळेकर, राजाराम रहाटे, बाबू बंदरकर आदी उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.