कुडाळसह कणकवली येथे स्त्री नसबंदी २० शस्त्रक्रिया

कुडाळसह कणकवली येथे
स्त्री नसबंदी २० शस्त्रक्रिया
Published on

कुडाळसह कणकवली येथे
स्त्री नसबंदी २० शस्त्रक्रिया

डॉ. धुरी ः शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १२ ः राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत लेप्रोस्कोपीक स्त्री नसबंदी शस्त्राक्रिया शिबिर महिला व बाल रुग्णालय कुडाळ व उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे झाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी ही माहिती दिली.
राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी १९०० कुटुंब कल्याण शस्त्राक्रियांचे उद्दिष्ट निश्चित केले असून १ हजार ३४ एवढे ५४ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. कुटुंब कल्याण स्त्री नसबंदी शस्त्राक्रियांसाठी पात्र लाभार्थींची लेप्रेस्कोपीद्वारे नसबंदी करण्याकडे जास्त कल असतो. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला बाल रुग्णालय, कुडाळ व उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे कुटुंब कल्याण स्त्री नसबंदी शस्त्राकिया शिबिराचे आयोजन केले होते. यासाठी डॉ. राजेश उबाळे (खासगी वैद्यकीय व्यावसायिक, वेंगुर्ला) यांनी उपस्थित राहून अनुक्रमे १२ व ८ असे एकूण २० कुटुंब कल्याण स्त्री नसबंदी शस्त्राकिया केल्या. या शिबिरात वेंगुर्ला, कुडाळ, कणकवलीतील पात्र लाभार्थी व त्यांचे प्रवर्तक आरोग्य सेविका, आशा सेविकांसोबत रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
सर्व रुग्णांना त्यांच्या घरापासून ने-आण करण्यासाठी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका उपलब्ध केली होती. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. हेमा तायशेटे यांनी काम पाहिले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धुरी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी शिबिरासाठी विशेष प्रयत्न केले. आरोग्य पर्यवेक्षक आर. डी. जोशी, वेंगुर्ले आरोग्य अधिकारी डॉ. लिलके, कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणोती इंगवले उपस्थित होते.
------------------
परदेश शिष्यवृत्तीसाठी
अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, ता. १२ ः सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना (मुला-मुलींना) दरवर्षी परदेश शिक्षणासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज द्यावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.साठी अद्ययावत विद्यापीठातून परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. पैकी ३० टक्के जागावर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करावा. पूर्ण भरलेले अर्ज वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करून त्याची सुस्पष्ट प्रिंट, ऑफलाईन नमुन्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयास ३० एप्रिलअखेर सादर करावे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएच.डी.साठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. योजनेच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com