महाळुंगेत विद्यार्थ्यांतर्फे ''प्लास्टिकमुक्त'' अभियान

महाळुंगेत विद्यार्थ्यांतर्फे ''प्लास्टिकमुक्त'' अभियान
Published on

swt1218.jpg
50874
महाळुंगेः स्वच्छता मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांसह मान्यवर. (छायाचित्र : एन. पावसकर)

महाळुंगेत विद्यार्थ्यांतर्फे
‘प्लास्टिकमुक्त’ अभियान
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १२ : प्लास्टिकची समस्या संपूर्ण जगभर आहे. आपण दैनंदिन व्यवहारात प्लास्टिक वापरणे टाळले तर या समस्येपासून खूप लांब जाऊ, असे प्रतिपादन मुख्याध्यापिका अर्चना मुसळे यांनी केले. देवगड तालुक्यातील महाळुंगे शाळा क्र. १ व २ मध्ये प्लास्टिकमुक्त भारत अभियान राबविण्यात आले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी छन्नुपाली डोहणे, अविनाश जायभाये, श्री. शिरगावकर, पर्यावरणप्रेमी मित्रमंडळ सदस्य संजय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. प्लास्टिकबाबत मुलांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील व परिसरातील सर्व प्लास्टिक गोळा करून ग्रामपंचायतीच्या प्लास्टिक कक्षामध्ये जमा केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश जायभावे यांनी केले. आभार छन्नुपाली डोहणे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com