तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच

तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच

Published on

50879

तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच

प्रलंबित मागण्यांप्रश्‍नी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १२ ः शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विविध कामे माध्यमिक शिक्षण विभागाकडे दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेतर्फे जिल्हा परिषदेसमोर आजपासून सुरू केलेले साखळी धरणे आंदोलन आजही तिसऱ्या दिवशी कायम आहे.
शिक्षक भारती या संघटनेकडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागील दोन वर्षे काळातील प्रलंबित कामे माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्रलंबित असून, अद्याप पूर्तता झालेली नाही. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत वेतन देयके, मेडिकल बिले तसेच मेडिकल बिलांसाठी रेशन कार्डची सक्ती रद्द करणे, रजा कालावधीतील प्रस्ताव, नागरिकांची सनद कार्यालयाबाहेर लावणे, थकीत बिलांची पूर्तता करणे, शाळाबाह्य कामे कमी करा, सहविचार सभा लावणे, निवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित पेन्शन प्रस्ताव पाठवणे ही कामे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. ती तात्काळ मार्गी लावावीत, याकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेतर्फे आज तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेसमोर साखळी धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे.
या आंदोलनात शिक्षक भारती संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर, संजय वेतोरेकर, दीपक तारी, विद्यानंद पिळणकर यांच्यासह शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी जिल्हा परिषदेसमोर गेले तीन दिवस बसूनही प्रशासनाकडून अद्याप दखल घेतली गेलेली नाही. जिल्ह्यात बंदी आदेश असल्याने आंदोलनाला मर्यादा येत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष वेतुरेकर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com