कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण

कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण

Published on

-rat१२p१८.jpg-
२५N५०८४१
रत्नागिरी : कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय व जनशिक्षण संस्थानतर्फे महिलांना प्रमाणपत्र वितरित करताना इनुजा शेख.
----
‘जन शिक्षण’तर्फे प्रमाणपत्र वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय यांच्यामार्फत तसेच मानव साधन विकास संस्था (मुंबई) पुरस्कृत जनशिक्षण संस्थानतर्फे प्रमाणपत्र वितरण सोहळा दैवज्ञ भवनात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थाध्यक्ष उमा प्रभू आणि अध्यक्षस्थानी जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता आणि रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या साहाय्यक आयुक्त इनुजा शेख होत्या. जनशिक्षण संस्थानचे विश्वस्त बबनराव पटवर्धन, योगेश प्रभू, कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड मंचावर उपस्थित होते.
संचालिका निधी सावंत यांनी प्रास्ताविकामध्ये जनशिक्षण संस्थानच्या रत्नागिरी शाखेने केलेल्या मागील तीन वर्षांच्या कामाचा आढावा घेतला. संस्थानमध्ये सर्व बॅच पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षक आणि ३७ बॅचमधील लाभार्थी ज्यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com