सचिन कारेकरांचा पाणलोट योद्धा पुरस्काराने गौरव
-rat१२p२०.jpg-
२५N५०८५२
गुहागर ः प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर यांना गौरवताना गटविकास अधिकारी शेखर भिलारे.
------
सचिन कारेकर यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १२ : आबलोली गावाचे सुपुत्र सचिन कारेकर यांचा गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक- २.० पाणलोट यात्रा, पाणलोट योद्धा हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. डीएड् कॉलेज सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला. या वेळी जलसंधारण विभाग पाणलोट क्षेत्र प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा निलम पालव, दिल्ली येथील भूमीसंधारण विभागाच्या टेक्निकल एक्स्पर्ट श्वेता नारायण, जिल्हा समन्वयक जस्मिन गार्दी, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग गुहागरचे उपअभियंता मंदार छत्रे, आबलोलीच्या सरपंच वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सूर्यवंशी, काजुर्ली गावच्या सरपंच मेघना मोहिते आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

