‘महाविहार’चे व्यवस्थापन बौद्धाकडे द्या

‘महाविहार’चे व्यवस्थापन बौद्धाकडे द्या
Published on

50886

‘महाविहार’चे व्यवस्थापन बौद्धाकडे द्या

‘वंचित’, महासभेची मागणी ः राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे मागणी

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १२ ः बौद्ध गया येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे, त्यासाठी अन्यायकारक कायद्यात बदल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी व बौद्ध महासभेच्या वतीने राष्ट्रपतींकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे सादर करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, प्रमोद कासले, अंकुश जाधव, बाबा सोनवडेकर, अभय पावसकर, सूर्यकांत बिबवणेकर, प्रभाकर जाधव, मधुकर जाधव आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सम्राट अशोक यांनी इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले. तथागत बुद्धाला ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. त्यामुळे देशातील नव्हे तर जगभरातील बौद्ध अनुयायी भिक्खू आणि पर्यटक या स्थळाला भेट देतात; मात्र या महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही. महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी १९९२ पासून आंदोलने होत आहेत; मात्र अजूनही महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा बदलण्यात आला नाही. जागतिक वारसा म्हणून मान्यता प्राप्त बौद्ध गया येथील महाविहार व्यवस्थापन कायदा तातडीने बदलण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच १९४९ चा अन्यायकारक कायदा रद्द करावा, बोधगया महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे, जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी विशेष विकास निधी आणि सुविधा तत्काळ देण्यात याव्यात, आदी मागण्यात करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com