नमन खेळ्यातील उत्पन्नातून ग्रामविकास
काही सुखद---लोगो
-rat१२p२१.jpg-
P२५N५०८५८
गुहागर ः निवोशी भेलेवाडी येथील ग्रामदेवता श्री जाखमाता देवीचे नमन खेळे.
-----
नमन खेळ्यातील उत्पन्नातून ग्रामविकास
निवोशी भेलेवाडीचा उपक्रम ; जाखमाता देवीचे नमन खेळे
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १२ : तालुक्यातील निवोशी भेलेवाडी येथील ग्रामदेवता श्री जाखमाता देवीच्या नमन खेळ्यांची परंपरा अनेक पिढ्या जोपासत आहेत. या खेळ्यातून प्राप्त उत्पन्नातून ग्रामविकासावर भर दिला जात आहे.
निवोशी गावातील श्री जाखमाता देवी देवस्थान यांच्यावतीने ही भोवनीच्या खेळ्यांची परंपरा अनेक वर्षानंतरही जपली जात आहे. ही मंडळी फागपंचमीच्या तिसऱ्या दिवशी गावभोवनीसाठी बाहेर पडतात. यामध्ये नकटा व गोमू यांचा समावेश असतो. नकटा हा शंकराचा अवतार असल्याचे सांगितले जाते. नमन मंडळी अनवाणी भोवनीसाठी फिरत असतात. यामध्ये ग्रामदेवतेची बहीण असणाऱ्या श्री हसलाई देवीच्या गावात अर्थात् वरवेलीत व दुसरी बहीण असणाऱ्या श्री झोलाई देवी अर्थात् पालशेत गावात ही नमन मंडळी भोवनीसाठी फिरत असतात. यामध्ये गावातील ३५ हून अधिक लोकांचा सहभाग असतो.
नमन खेळ्यांतून मिळालेले उत्पन्न ग्रामदेवतेच्या मंदिरासाठी निधी, सोयीसुविधा, मंदिराचे बांधकाम तसेच मारूती मंदिर, सभागृह, देवीची सहान, चांदीचे रूपे तसेच गावातील इतर विकासासाठी खर्ची करण्यात येतात. नमन मंडळी भोवनीची सुरवात निवोशी ग्रामदेवता श्री जाखमाता देवीच्या मंदिरात मृदुंगाची थाप मारून म्हणजेच तिचा आशीर्वाद घेऊन नमनखेळे गाव भोवनीला बाहेर पडतात. प्रथम श्री जाखमाता देवीची बहीण वरवेलीतील श्री हसलाई देवी असल्याने याच गावातून करण्यात येते. दुसरी बहीण पालशेत गावाची ग्रामदेवता श्री झोलाई देवीला भेट देऊन तिचा आशीर्वाद घेतला जातो. त्यानंतर वेळंब, शृंगारतळी बाजारपेठ येथे भोवनीसाठी जात असतात.
---
अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचाही सहभाग
निवोशी येथील श्री जाखमाता देवीची स्थापना शेकडो वर्षांपूर्वी करण्यात आली. तेव्हापासून नमन खेळेमंडळी गाव भोवनीसाठी बाहेर पडत असतात. या खेळ्यांमध्ये देवस्थान अध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थही सहभागी होतात. शेवटी होळीच्या आदल्या दिवशी वाजतगाजत नमन खेळे निवोशी गावी परततात.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

