एस. बी. कीर लॉ कॉलेजमध्ये युवा संसद कार्यक्रम

एस. बी. कीर लॉ कॉलेजमध्ये युवा संसद कार्यक्रम
Published on

-rat१२p१९.jpg-
२५N५०८४२
रत्नागिरी : एस. बी. कीर लॉ कॉलेजमध्ये आयोजित युवा संसद कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी, प्र. प्राचार्य, प्राध्यापक.
-----------
‘कीर लॉ’मध्ये युवा संसद कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : येथील श्रीमान भागोजीशेठ कीर लॉ कॉलेजमध्ये रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत कार्याध्यक्ष (कै.) अरूअप्पा जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ युवा संसद कार्यक्रम झाला. यात विद्यार्थ्यांनी कायदेकर्त्यांच्या भूमिकेत उतरून गंभीर सामाजिक मुद्द्यांवर उत्साही चर्चा केली.
विद्यार्थ्यांनी संसदीय सत्रामध्ये भाग घेऊन कायदेशीर सुधारणा, पर्यावरणीय धोरणे आणि सामाजिक न्याय यासारख्या विषयांवर चर्चा केली. नागरी जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्राचे भविष्य घडवण्यासाठी तरुणांना सक्रिय भूमिका घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी युवा संसद कार्यक्रमाच्या माध्यमातून कॉलेजच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.
प्राचार्य डॉ. आशिष बर्वे म्हणाले, आमचे विद्यार्थी भविष्यातील नेते, व्यावसायिक आणि समाजात बदल घडवणारे नागरिक आहेत. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कायदेशीर जगात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ज्ञान, कौशल्ये आणि नैतिक पाया देऊन सक्षम करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com