आपल्या पाल्याच्या प्रगतीबाबत 
सदैव सजग राहा ः प्रा. भोसले

आपल्या पाल्याच्या प्रगतीबाबत सदैव सजग राहा ः प्रा. भोसले

Published on

आपल्या पाल्याच्या प्रगतीबाबत
सदैव सजग राहा ः प्रा. भोसले

कणकवली शाळा क्र. ५ येथे मार्गदर्शन

कणकवली, ता. १२ ः सध्याच्या काळात पालकांच्या जबाबदाऱ्या वाढल्या असून, पालकांनी अधिक सजग राहणे गरजेचे आहे. आपल्या पाल्यांना मोबाईलपासून दूर ठेवले पाहिजे आणि वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. रीमा भोसले यांनी येथे केले.
जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक पाचमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. साहित्यिक प्रा. रीमा भोसले, सखी सावित्री समिती सदस्य रोजा खडपकर, समाजसेविका प्रियाली सुरेंद्र कोदे, अंगणवाडी सेविका स्वाती पोयेकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष केतकी दळवी, मुख्याध्यापक कल्पना मलये, उपशिक्षक शर्मिला चव्हाण आदी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता प्राध्यापक रीमा भोसले यांनी मार्गदर्शन केले. रोजा खडपकर यांनी समाज माध्यम, महिला व मुलींविषयी मार्गदर्शन केले. तसेच मुलींच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. महिला पालकांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम झाला. विविध प्रकारच्या क्षमता महिला पालकांच्या अंगी याव्या, यासाठी विविध खेळ घेतले. सदर स्पर्धेचे परीक्षण अनुष्का पडते यांनी केले. खेळ पैठणी स्पर्धेतील प्रथम गौरी पाताडे, द्वितीय संदिशा शिगवण, तृतीय रसिका मिराशी यांना सुरेंद्र ऊर्फ अण्णा कोदे पुरस्कृत पैठणी देऊन सन्मानित केले. मुख्याध्यापक कल्पना मलये यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षक शर्मिला चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com