शेतकरी ओळख क्रमांकासाठी आवाहन

शेतकरी ओळख क्रमांकासाठी आवाहन
Published on

‘शेतकरी ओळख क्रमांक काढा’
चिपळूण, ता. १४ ः ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा शेतकरी ओळख क्रमांक होळी सणाच्या निमित्ताने परतलेल्या शेतकरीबंधूंनी काढून घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभाकडून आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे यासाठी ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यात येत आहे. या द्वारे शेतकऱ्यांची व त्याच्या जमिनीची ओळख पटवणारा व शेतकऱ्यास अद्वितीय शेतकरी ओळख क्रमांक मिळणार आहे. ॲग्रीस्टॅक योजनेतून शेतकऱ्यांना सर्व कृषी योजनांचा लाभ मिळण्यामध्ये सुलभता, पीएम किसान योजनेतील आवश्यक अटी पूर्ण करून शेतकऱ्यास लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पीएम किसानच्या नवीन लाभार्थी नोंदणीसाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक केला आहे. शेतकरी ओळख क्रमांक काढण्यासाठी शेतकऱ्याचा आधार नंबर, आधार संलग्न मोबाईल नंबर, शेतजमिनीचे खाते नंबर आवश्यक आहे. शेतकरी ओळख क्रमांकसाठी नजीकच्या नागरी सुविधा केंद्र, संबंधित गावातील ग्राममहसूल अधिकारी/कृषी सहाय्यक/ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com