गुहागर ः महानेटच्या भूमिगत वाहिन्यांच्या कामाने वादाला निमंत्रण

गुहागर ः महानेटच्या भूमिगत वाहिन्यांच्या कामाने वादाला निमंत्रण
Published on

rat12p24.jpg
50870
गुहागर : असगोलीतील तीव्र उतारावर खोदाईमुळे आलेली माती साफ करण्याची तसदी कंत्राटदार घेत नाही.

महानेटच्या भूमिगत वाहिन्यांमुळे अनेक वाद
अंकुश कोणाचा; अनेक ठिकाणी नियम बसविले धाब्यावर
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १२ : सध्या तालुक्यात महावितरण आणि महानेटच्या भूमिगत वाहिन्यांचे काम वेगाने सुरू आहे. ठेकेदार स्थानिक प्रशासन, ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम करत असल्याने अनेक ठिकाणी वाद निर्माण होत आहेत. प्रशासकीय यंत्रणादेखील कंत्राटी काम असल्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने होणाऱ्या या कामावर नक्की अंकुश कोणाचा आहे का, असा प्रश्न सध्या तालुकावासीयांकडून उपस्थित केला जात आहे.
रस्त्याच्या कडेने खोदाई करून भूमिगत वाहिन्या टाकण्याच्या कामात सुरक्षेची कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे पाळली जात नाहीत. तालुक्यातील असगोली गावातील तीव्र उताराच्या अरुंद रस्त्यावर खोदाई केलेली माती टाकल्याने दुचाकीस्वार घसरून पडले. गुहागर शहरात रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यात पडून असगोलकर नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. आजही हा तरुण रुग्णालयात उपचार घेत आहे. गुहागर शहरातील खालचापाट परिसरात खोदाईचे काम करताना जलवाहिनी फुटली. पालशेतमध्ये गटारातच खोदाई सुरू होती. हे थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामस्थांना शिवीगाळ करण्यात आली. महावितरणची भूमिगत वाहिनी जमिनीपासून चार फूट खोल टाकलेली नाही.

चौकट
हे आहेत आक्षेप
भूमिगत वाहिनी दोन ते तीन फूट खोलवर
पुलावरून वाहिन्या, त्यावर काँक्रिटीकरण
पॅरापेट, रेलिंगच्या बाजूने क्लँप नाहीत

चौकट
सार्वजनिक बांधकामचे दुर्लक्ष
स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन तेथील समस्या जाणून काम करावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे; परंतु स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनापासून, पंचायत समिती, महसूल, सार्वजनिक बांधकाम या खात्यांचे अधिकारी; मात्र या कामाकडे दुर्लक्ष करतात की काय, अशीच सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कामाला जबाबदार कोण, असा प्रश्न सध्या तालुकावासीयांना पडला आहे.

कोट
केबलने आमच्या गावातील सतेश घाणेकर याचा वर्षभरापूर्वी बळी गेला. सुचित असगोलकरच्या मेंदूला मार लागल्याने तो रुग्णालयात आहे. भूमिगत वाहिन्यांच्या कामावर प्रशासनाचे नियंत्रण नाही.
- राहुल कनगुटकर, असगोली

पालशेत गावात गटाराचे काम मंजूर झाल्याने येथे चेंबर बांधू नका, असे सांगायला गेल्यावर झालेल्या वादात ठेकेदार कंपनीच्या महिला अधिकाऱ्यांनी मलाच शिवीगाळ केली. हे सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यासमोर घडले तरीही त्यांनी चकार शब्द काढला नाही.
- विजय नागवेकर, पालशेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com