

50914
साक्षी लबदे पैठणीच्या मानकरी
कलमठची स्पर्धा ः पाककला स्पर्धेलाही प्रतिसाद
कणकवली, ता. १२ : कलमठ बिडयेवाडी येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सलग दुसऱ्या वर्षी महिलांतर्फे होम मिनिस्टर स्पर्धा व पाककला स्पर्धेचे आयोजन केले होते. रंगतदार झालेल्या स्पर्धेत साक्षी लबदे या पैठणीच्या मानकरी ठरल्या. द्वितीय भाग्यलक्ष्मी लोके, तृतीय नम्रता पुजारे विजेत्या ठरल्या. उत्तेजनार्थ राधिका पुजारे यांना गौरविण्यात आले. स्पर्धेत ३५ महिला सहभागी झाल्या.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कलमठ बिडयेवाडी गणेश मंदिर येथे होम मिनिस्टर स्पर्धा व पाककला स्पर्धा झाली. पाककलेसाठी नाचणी या धान्यापासून पदार्थ बनविणे, असा विषय होता. या स्पर्धेत अनुक्रमे- शीतल जाधव (नाचणीची बर्फी), गायत्री चाफेकर (नाचणीचे मोदक), शैलजा मुखरे (नाचणीचा खरवस), उत्तेजनार्थ माधुरी फडके यांना गौरविले.
होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षिसे दिली. स्पर्धेचे निवेदन सुप्रिया पाटील यांनी केले. पाककलेचे परीक्षण निवृत्त शिक्षिका मनाली चव्हाण, सुगंधा देवरुखकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंच सदस्या प्रीती मेस्त्री, मिताली वाळके, शैलजा मुखरे, भाग्यलक्ष्मी लोके, श्रावणी मेस्त्री, गीता मस्तमर्डी, रसिका चव्हाण, राधिका पुजारे, अर्चना लाड, रत्नावली लाड आदींनी मेहनत घेतली. या कार्यक्रमात म्युझिक सिस्टीमसाठी सहकार्य प्रसाद मेस्त्री यांनी केले. स्पर्धा होण्यासाठी मैथिली लोके, श्रद्धा मस्तमर्डी, रोशनी मस्तमर्डी, रिया चव्हाण या मुलींचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.