क्राईम
संशयास्पद हालचाली
प्रकरणी एकावर गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील साळवीस्टॉप येथील जलतरण तलावाच्या बाजूला स्वतःचे अस्तित्व लपवणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र नेवरेकर असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ११) रात्री सव्वाच्या सुमारास साळवीस्टॉप जलतरण तलावाच्या बाजूला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित नेवरेकर हा अंधाराचा फायदा घेऊन स्वतःचे अस्तित्व लपवून संशयितरित्या सापडला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल पंकज पडेलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली.
---
मजुरीचे पैसे
मागणाऱ्यास मारहाण
रत्नागिरी ः कातळवाडी-कुवारबाव येथील वृद्धाने मजुरीचे पैसे मागितल्याच्या रागातून संशयिताने वृद्धाच्या डोक्यावर लोखंडी सळी घालून जखमी केले. जखमी वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रीकांत सावंत असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १२) दुपारी कातळवाडी-कुवारबाव येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी फिर्यादी पुंडलिक ज्ञानदेव पाटील (वय ६०, रा. कातळवाडी-कुवारबाव) यांनी संशयित श्रीकांत सावंत यांच्याकडे मजुरीचे पैसे मागितले. त्याचा राग मनात धरून संशयिताने त्यांच्या डोक्यात लोखंडी सळी घालून जखमी केले. या प्रकरणी पोलिस हवालदार संतोष गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
---
आदेश उल्लंघन
करणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी ः तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू उर्फ राजेंद्र विठ्ठल तळेकर (रा. फिनोलेक्स कॉलेजजवळ एमआयडीसी-मिरजोळे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ९ एप्रिल २०२४ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे घडली. या प्रकरणी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी राजाराम म्हात्रे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित तळेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
------
वाहतुकीस अडथळा
करणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी ः नाटे-बसस्टॉप (ता. राजापूर) येथील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा करणाऱ्या संशयित वाहनचालकाविरुद्ध नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित चंद्रकांत करगुटकर (वय ३७, रा. आंबोळगड, ता. राजापूर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ११) सायंकाळी नाटे बसस्टॉप येथे निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल किरण जाधव यांनी नाटे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
------
युवतीचा विनयभंग
प्रकरणी एकास अटक
खेड ः जिल्ह्यातील एका २८ वर्षीय युवतीचा विनयभंग करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी प्रतीक संजय शिंदे (२४) यास येथील पोलिसांनी अटक केली. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता संशयिताची ३ दिवस पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ही घटना ऑक्टोबर २०२३ ते १० मार्च २०२५ या कालावधीत घडल्याचे पीडितीने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. २ वर्षापूर्वी युवतीची संशयिताशी सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर मॅसेजद्वारे बोलणे सुरू झाले. २०२३च्या नवरात्रोत्सवात दोघांची खेडमध्ये प्रत्यक्ष भेटही झाली. यानंतर व्हॉटस्अॅप व्हिडिओ कॉलवर वेळोवेळी बोलणे सुरू असताना अश्लील शब्द वापरत विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. जातीवाचक शिवीगाळ करत ब्लॅकमेल केल्याचेही पीडित युवतीने पोलिस ठाण्यात नोंदवल्यानंतर तरुणास पोलिसांनी अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

