रत्नागिरी-ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू

रत्नागिरी-ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू
Published on

ज्येष्ठ नागरिकांसाठी
हेल्पलाईन नंबर सुरू
रत्नागिरी, ता. १२ः जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना कुठल्याही संकटाच्यावेळी तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणीचे निवारण होऊन त्यांना आवश्यक ती सर्व मदत मिळावी, या हेतूने जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्हा पोलिसदलातर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी ८३९०९२९१०० हा नवीन हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. यामध्ये व्हॉटसअॅपसुद्धा उपलब्ध आहे.
घरातील तरुण पुरुष व महिला या नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबई व इतर शहरांमध्ये वास्तव्यास असतात. घरामध्ये ज्येष्ठ नागरिक हे एकटेच असतात तसेच निराधार ज्येष्ठ नागरिक हे सुद्धा घरामध्ये एकटेच असतात. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांचे तत्काळ मदतीसाठी व त्यांचे तक्रारी, अडचणींचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. हा नंबर २४ तास सुरू असणार आहे. ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असून, त्यांच्या सुरक्षेची प्राधान्याने काळजी घेण्यासाठी रत्नागिरी पोलिस कटिबद्ध आहेत. अडचणीच्यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी मोबाईल नंबर ८३९०९२९१०० या हेल्पलाईन नंबरवर फोन किंवा व्हॉटसअॅप् मेसेज करण्याबाबत आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com