

५०७७७
एलईडी वापरणाऱ्या नौका जप्त
मत्स्य विभागाची कारवाई ः जप्त नौका बुरोंडीतून दाभोळात, पाचपट दंड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी/दापोली, ता. १२ : विजेच्या प्रखर दिव्यांच्या (एलईडी) साह्याने बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मत्स्य विभागाच्या जोरदार मोहिमेत दापोली तालुक्यातील लाडघर-बुरोंडी समुद्रामध्ये काल मध्यरात्री एलईडी लाईट वापरणाऱ्या नौकेवर कारवाई केली. या नौकेवर तांडेलसह ४ खलाशी होते. नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवली आहे.
काल (ता. १२) मध्यरात्री रात्री दीडच्या सुमारास लाडघर बुरोंडीसमोर मत्स्य व्यवसाय विभागाची अंमलबजावणी अधिकारी दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) व स्वप्नील चव्हाण, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर) हे स्थानिक लोकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने गस्त घालत होते. या वेळी राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली यासिन अब्दुल गफूर मुकादम (रा. खडप मोहल्ला, रत्नागिरी) यांची अब्दुल गफूर ही नौका महाराष्ट्रातील जलधीक्षेत्रात लाडघर-बुरोंडीसमोर अनधिकृतरित्या एलईडी लाईट वापरत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे बोट पकडली. त्यावर मासळी आढळलेली नाही. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त केली आहेत.
सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सागर कुवेसकर, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी सुरक्षा पर्यवेक्षक दाभोळ, प्रशांत येलवे, सागरी सुरक्षारक्षक योगेश तोस्कर, राजन शिंदे, मंदार साळवी व गस्ती नौका रामभद्रावरील कर्मचारी ज्ञानेश्वर अजगोलकर, विशाल यादव, शिवकुमार सिंग यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
चौकट १
स्थानिकांकडून तक्रार
लाडघर किनारी एलईडीद्वारे मासेमारी होत असल्याच्या तक्रारी स्थानिक लोकांनी केल्या होत्या. त्यावरून मत्स्य विभागाकडून या परिसरात गस्त सुरू केली होती. या गस्ती पथकाला मासेमारी करण्यासाठी जाणारी ती नौका आढळली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.