जाळ्यात अडकलेल्या चार कासवांना जीवदान
-rat१२p३७.jpg, rat१२p३८.jpg -
KOP२५N५०९१७
दापोली ः करजगाव तामसतीर्थ येथील कासवमित्रांनी जाळ्यात अडकलेल्या कासवांची सुटका करून त्यांना समुद्रात सोडले.
-----
जाळ्यात अडकलेल्या कासवांना जीवदान
कासवमित्रांचा पुढाकार; खोल समुद्रात सोडले
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १४ ः डॉल्फिन सफरसाठी चाललेल्या करजगाव तामसतीर्थ येथील ग्रामस्थांनी जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या ४ कासवांना वाचवून पुन्हा समुद्रात सोडले.
सोमवारी (ता. ११) सकाळी १० वाजता करजगाव तामसतीर्थ येथील संदीप मोरे हे इतर चौघांना घेऊन डॉल्फिन सफरीला जात होते. साधारण किनारपट्टीपासून १०० मीटरच्या अंतरावर मच्छीसाठी जाळी लावण्यात आली होती. तिथे काहीतरी तडफडताना दिसले म्हणून ते जवळ गेले असता त्यांना जाळ्यात अडकलेले कासव दिसले. त्यांच्यासोबत सलील मोरे, सनिज शिरधनकर, संजय शेट्ये, प्रवीण शेट्ये, बंड्या व प्रितम बागकर होते. मात्र जाळे ओढल्यावर त्यामध्ये चार कासवं अडकलेली दिसून आली. त्यामुळे जाळे कापून कासवांना जाळ्यातून सोडवून फायबर बोटीत घेतले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. कारण दोघांच्या मानेभोवतीच जाळे अडकले होते, तर दोघांच्या पायात जाळे गुरफटले होते. कांदळवन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली जाळ्यातून सोडवून खोल समुद्रात नेऊन सोडले. त्यांच्याबरोबर कासवमित्र संजय शेट्ये होते. या मादी कासव असून त्या किनाऱ्यावर अंडी घालायला येत असताना जाळ्यात अडकल्या असण्याची शक्यता या वेळी कासवमित्र शेट्ये यांनी व्यक्त केली, अशी माहिती करजगाव तामसतीर्थ येथील संदीप मोरे यांनी दिली.
----
दापोलीतून ३८२ पिल्ले समुद्रात
ऑलिव्ह रिडले जातीच्या मादी कासव दापोलीच्या किनारपट्टीला अंडी घालण्यासाठी सर्रास येतात. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले-२७ घरटी २९८४ अंडी, दाभोळ-१२२ घरटी ११ हजार ७३७ अंडी, केळशी - ३५ घरटी ३६९१ अंडी, आडे-५ घरटी ५०५ अंडी, कर्दे-१० घरटी १११९ अंडी, कोळथरे-५१ घरटी ५२१२ अंडी, लाडघर-८ घरटी ८२१ अंडी, मुरूड-१६ घरटी १६५४ अंडी. या संरक्षित घरट्यातून आत्तापर्यंत दापोलीत ३८२ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

