भावगीत गायनमध्ये डॉ. मानसी वझे अव्वल
swt146.jpg
51125
सावंतवाडीः येथील कळसुलकर हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवर.
भावगीत गायनमध्ये डॉ. मानसी वझे अव्वल
सावंतवाडीतील स्पर्धाः श्री सद्गुरू संगीत मंडळ, कळसुलकर हायस्कूलतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ः श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ व कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी यांच्यावतीने (कै.) रघुनाथ उर्फ बाबी मेस्त्री यांच्या १५ व्या स्मृतिदिनानिमित्त महिलांसाठी जिल्हास्तरीय भावगीत गायन स्पर्धा व सद्गुरू संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सवेश नाट्यगीत गायनाचे आयोजन केले होते. कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. भावगीत गायन स्पर्धेत डॉ. मानसी वझे, राधा कुशे, अनामिका मेस्त्री यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. उत्तेजनार्थ पारितोषिक मीना उकिडवे, सोनिया सामंत, सिद्धी सहस्त्रबुद्धे, कोमल पावसकर, पूजा दळवी यांनी देण्यात आले.
भावगीत गायन स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी राजश्री टिपणीस, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या सदस्या अॅड. नेवगी, विश्वकर्मा सुतार समाज समिती सावंतवाडीच्या सचिव अमीदी मेस्त्री आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण माजी प्राचार्य व ज्येष्ठ कीर्तनकर प्रशांत धोंड यांनी केले. सूत्रसंचालन अशा मुळीक यांनी केले. स्पर्धेसाठी संगित साथ निलेश मेस्त्री, किशोर सावंत, मंगेश मेस्त्री, सिद्धेश सावंत, गोविंद मळगांवकर, तन्वी मेस्त्री, पुरुषोत्तम केळुसकर,मनीष पवार, किरण सिद्धिये, दुर्वा सावंत, भास्कर मेस्त्री, केतकी सावंत यांनी दिली. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै, ज्येष्ठ नाट्यकर्मी वसंत उर्फ भाऊ साळगावकर, संगीत अलंकार श्रीराम दीक्षित आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रामध्ये भास्कर मेस्त्री, विलास नाईक, हेमंत गोडकर, प्रथमेश मोरजकर, श्रिया म्हालटकर, अलिशा मेस्त्री, मुग्धा पंतवालावलकर, चिन्मयी मेस्त्री, उमा तिळवे, मानसी वझे, नेहा दळवी, सानिका सासोलकर, रिया मेस्त्री, मधुरा खानोलकर, निधी जोशी, सिद्धी परब, भास्कर मेस्त्री, सर्वेश राऊळ, केतकी सावंत या सद्गुरू संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा करून एका पेक्षा एक सरस सवेश नाट्यपदे सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. संगित साथ निलेश मेस्त्री, किशोर सावंत, निरज भोसले, मंगेश मेस्त्री, पुरुषोत्तम केळुसकर यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कात्रे यांनी केले. कार्यक्रमाची ध्वनी व्यवस्था हेमंत मेस्त्री यांनी सांभाळली.
यावेळी सावंत, चंद्रकांत घाटे, प्रा. केदार म्हसकर, नितीन धामापुरकर, विलास नाईक, मंगेश चिटणीस, भास्कर मेस्त्री, सोमा सावंत, हेमंत खानोलकर, मंडळाचे सचिव वैभव केंकरे, उपाध्यक्षा उत्कर्षा मेस्त्री व आशा मुळीक यांचे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. कळसुलकर इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष शिवराज पाटणकर, श्रीपाद चोडणकर, मंजिरी धोपेश्वरकर, मानसी भोसले, कामगार कल्याण केंद्र कुडाळच्या केंद्रप्रमुख सुष्मिता नाईक, गायत्री देशपांडे, सुधीर धुमे, अर्चना वझे, वैभवी पुराणिक, डॉ. अभिजीत वझे, मिलन मुतालिक, माजी क्रीडा सभापती उमाकांत वारंग, चिन्मय रानडे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

