''पालकमंत्री राणेंचे वागणे जातीय तेढ निर्माण करणारे''
swt142.jpg
51121
बाबुराव धुरी
‘पालकमंत्री राणे यांचे वागणे
जातीय तेढ निर्माण करणारे’
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १४ः पालकमंत्री नितेश राणे यांचे मुस्लिम समाजाविरोधातील वागणे जातीय तेढ निर्माण करणारे आहे, असे ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. मुस्लिम समाजाच्या पाठीशी ठाकरे शिवसेना कायम असेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
ओरोस येथे असलेला गादी कारखाना हटविल्यानंतर धुरी यांनी पालकमंत्री राणेंवर टिका केली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अल्पसंख्यांक समाज कायमच हिंदू बांधवांचा आदर करत आला आहे. त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नसून त्यांनी एकटे असल्याचे वाटून घेवू नये. जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम सलोख्याने राहत आहेत. ओरोस येथील संबंधित पीडित कुटुंबियाची आम्ही भेट घेणार आहोत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार करुन त्या बांधवाला न्याय देण्याची मागणी करणार असल्याचे धुरी यांनी पत्रकात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

