विद्यार्थ्यांनी घेतली स्विमींगची माहिती
विद्यार्थ्यांनी घेतली स्विमिंगची माहिती
डेरवण युथ गेम्स ; युथ गेम्सचे निमित्त
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १४ ः चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडासंकुलात यूथ गेम्सला प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या खेळांची माहिती दिली जाते. यंदा स्विमिंग या खेळाची माहिती देण्यात आली आहे. स्विमिंग, डायव्हिंग आणि आर्टिस्टिक स्विमिंग या सर्व प्रकारांची २०२४ ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी आणि आत्तापर्यंतची उत्कृष्ट माहिती नमूद करण्यात आली आहे.
एसव्हीजेसिटी स्पोर्ट्स अॅकॅडमीमधील जलतरणपटूंची माहिती आणि त्यांची उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहे. स्विमिंगमधील ५०, १००, २००, ४००, ८०० आणि १५०० मीटर या विविध गटांतील ऑलिम्पिक विजेत्यांची नावे, जन्मदिवस, देश आणि प्रत्येक प्रकारातील वैयक्तीक कामगिरी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. डायव्हिंग या प्रकारातील ३ मीटर स्प्रिंग बोर्ड आणि १० मीटर प्लॅटफॉर्म या प्रकारातील वैयक्तीक आणि सिक्रोनाईज्ड प्रकारातील विजेत्यांची माहिती देण्यात आली आहे. याप्रसंगी राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेती श्रावणी वालावलकर म्हणाली, डेरवणच्या एसव्हीजेसिटी या अॅकॅडमीत मी २०१८ ला प्रवेश केला. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या विविध सुविधा तसेच प्रशिक्षक यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाल्यामुळे स्विमिंग या खेळात नैपुण्य मिळवले.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

