शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करावे

शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करावे

Published on

शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करावे
अजय तेंडुलकर ः उद्योगमंत्री सामंत यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १४ ः तापमानवाढीमुळे जिल्ह्यातील आंबा, काजू पिकाला मोठा फटका बसला आहे. याबाबत अधिवेशनात आवाज उठवून कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त अजय तेंडुलकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. या वेळी सुनील नावले, प्रवीण शिंदे, जितेंद्र शिरसेकर आदी उपस्थित होते
रत्नागिरी तालुक्यामध्ये ४६ मंडळ (सजा) असून, २०६ गावे आहेत. ४६ मंडळांना (सजांना) ४६ कृषी साहाय्यक आवश्यक असून, केवळ १० कृषी साहाय्यक ४६ मंडळे (सजा) सांभाळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांना अभ्यासदौऱ्यांसाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून द्यावा. सन २०२४-२५ आंबा व काजूपिकांचा हंगाम सुरू असून, गेल्या काही दिवसात तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात सातत्याने ३६, ३८, ३९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले जात आहे. त्याचा फटका आंबा व काजू उत्पादनावर होत आहे. त्यामुळे बागायतदार संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांवर आलेले संकट अधिवेनशनात मांडून तात्पुरत्या स्वरूपात नुकसान भरपाई न देता ठोस उपाययोजना म्हणून कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com