

-rat१४p९.jpg-
२५N५१०९२
रत्नागिरी : फॅशन शो सादर करताना पुण्याच्या मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनी.
---
निसर्गाच्या संकल्पनेवर आगळावेगळा फॅशन शो
‘बीकेव्हीटीआय’ येथे कार्यक्रम ; ‘रेझिन आर्ट तंत्रा’चा प्रथमच वापर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा स्थलांतर सोहळा उत्साहात पार पडला. या निमित्त पुण्याच्या मणिलाल नानावटी व्होकेशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या फॅशन डिझायनिंग विभागाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या फॅशन शोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राला एक नवा आयाम मिळाला.
जयेश मंगल कार्यालयात हा कार्यक्रम हजारो महिलांच्या उपस्थितीत झाला. वेगवेगळ्या सात संकल्पनांवर वेगवेगळ्या कपड्यांमध्ये विद्यार्थिनींनी शो सादर केला. प्रथमच रेझिन आर्ट तंत्राचा वापर करून कापडावर नवनवीन नमुने साकारले. किंगफिशर पक्षाच्या चमकदार रंगाचा वापर करून ब्रुचेस बाय दी ब्रूक या कलेक्शनमध्ये केला. रेडियन्ट ब्लू, फायरी ऑरेंज आणि काम पीच कलरचा वापर केला. पुनर्वापर किंवा सस्टनेबिलिटी यावर आधारित स्कायबॉन्ड रिव्हायव्हल हे कलेक्शन लक्षवेधी ठरले. यात वापरलेल्या डेनिमस व लेस कापडाचा वापर केला होता. शुद्धता व सुसंस्कृता दर्शवणाऱ्या लिली फुलापासून प्रेरणा घेत ब्लॉसमिंग ग्रेस हे कलेक्शन सादर केले.
फ्रोझन एलेगन्स या कलेक्शनमध्ये पारंपरिक आणि नावीन्यपूर्ण डिझायनिंगचा वापर केलेले कपडे सादर करण्यात आले. शिल्पकला, नाजूक काढणी आणि आकर्षक डिझाइन यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. नॉर्दन कार्डिनल पक्ष्याच्या मोहक सौंदर्याने प्रेरित विंग्स ऑफ ग्लॅमर हे कलेक्शन हे लाल रंगांचे कपडे लक्ष वेधून घेत होते. वाहत्या पाण्यापासून प्रेरित अॅक्वा अरोरा या कलेक्शनमध्ये फ्लोवी फॅब्रिक्सचा वापर केला तसेच चमकदार मोती आणि रेसिन आर्टचा सुरेख उपयोग केला. नॉर्दन मिस्टिक हे कलेक्शन नॉर्दन लाईटपासून प्रेरित होऊन बनवण्यात आले होते. हिरवा, लाल, जांभळा, पिवळा आणि निळा रंगाचा वापर करत त्यावर डिजिटल डिजाईन प्रिंट्स, कॉर्सेटस व नवीन ड्रेपिंग टेक्निक्सचा वापर केला गेला.
गारमेंट कलेक्शनचे मार्गदर्शन शिवानी जोशी व भाग्यश्री दाबके यांनी केले. शिवानी अरसुल यांनी सूत्रसंचालन केले. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या नानावटी इन्स्टिट्यूटच्या संचालिका माधवी शिंदे व फॅशन डिझाईन विभागप्रमुख पूजा दरेकर उपस्थित होत्या. विशेष अतिथी अभिनेत्री संपदा जोगळेकर आणि मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.
----
यांनी घेतला सहभाग
फॅशन शोमध्ये स्नेहा धावडे, तृप्ती खोपडे, योगिता विटकर, गौरी मोरे, हिमाली मैंद, दिव्या साळवी, सायली एच., अपूर्वा बुडगे, अंजली भुतकर, साक्षी मोहोळ, अक्षता गोने, साक्षी शेळके, शिल्पा वायकर, प्राप्ती गायकवाड, पायल सदाफुले, वैष्णवी बराटे, प्राजक्ता पवार, सिद्धी पळसकर, साक्षी निगुसकर, दिव्या राजपूत, नमो रांका, प्राजक्ता जोरी, श्रुती पवार, ऐश्वर्या सूर्यवंशी, सायली चव्हाण, निकिता दोरगे, तृप्ती ढोबळे आणि अमृता धुमाळ यांनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.