

rat14p6.jpg
51089
संगमेश्वरः शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास सूर्यकिरणे थेट कर्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून शिवलिंगावर पडली.
---------
कर्णेश्वर मंदिरात सोनेरी किरणांचा अभिषेक
पूर्वाभिमुख मंदिर; पाच दिवस घेता येईल अनुभूती
संगमेश्वर, ता. १४ ः संगमेश्वर तालुक्यातील कसबा या ऐतिहासिक गावात असणाऱ्या चालुक्यकालीन कर्णेश्वर मंदिरातील शिवलिंगावर १४ ते १८ मार्चदरम्यान सकाळी पावणेसात वाजता सोनेरी किरणांचा अभिषेक होणार आहे. शुक्रवारी (ता. १४) सकाळी सातच्या सुमारास सूर्यकिरणांनी श्री कर्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच शिवलिंगावर पडलेली सूर्यकिरणे पाहून जणू सूर्याने शिवलिंगावर सोनेरी अभिषेक केल्याची अनुभूती भाविकांना घेता आली.
पूर्वीची मंदिरे उभारताना स्थापत्यशास्त्राचा अभ्यास किती प्रगत होता, याची अनुभूती अशा प्रसंगातून येते. कसबा येथील कर्णेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असल्याने काही ठराविक कालावधीत मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर सूर्य आल्यानंतर शिवलिंगावर असा किरणांचा सोनेरी अभिषेक होतो. हे मंदिर अप्रतिम शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. मंदिर प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शिल्पात कोरलेले प्रसंग अचंबित करतात. या मंदिरातील दगडी झुंबरेदेखील अत्यंत नाजूक असून, शिल्पकारांच्या अद्भुत कौशल्याची साक्ष या नाजूक कलाकुसरीतून दिसून येते.
चौकट
पाच दिवस विविध दिनविशेष
शुक्रवारी धूलिवंदन, १५ ला वसंतोत्सवारंभ, १६ ला संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठगमन वर्षाची सांगता (तुकाराम बीज), १७ ला संकष्टी चतुर्थी आणि तिथीनुसार शिवजयंती, अशा विविध दिनविशेष असलेल्या १४ ते १८ मार्च या काळात श्री कर्णेश्वरास सूर्यस्नानाचा अनुपम सोहळा होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.