खेड-खेडमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
खेडमध्ये अधिकारी,
कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
कामावर परिणाम ; १ मे रोजी उपोषणाचा इशारा
खेड, ता. १४ : तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सातत्याने सर्वच शासकीय कार्यालयांत अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी कमी होत आहे. त्यामुळे विकासकामांसह प्रशासकीय कामेही खोळंबली आहेत.
विकासकामे करण्यासाठी पुरेसा अधिकारी व कर्मचारीवर्ग उपलब्ध नसल्याने तालुक्याचा विकास अत्यंत मंदगतीने सुरू आहेत. ही पदे तत्काळ भरा अन्यथा १ मे रोजी भरणेनाका येथे उपोषण करण्यात येईल, असा इशारा महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी दिला आहे.
पंचायत समितीत सहा महिन्यांपासून पूर्णवेळ गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद बांधकाम विभागात उपअभियंता नसल्याने सामान्य जनतेची कामे रखडली आहेत. अनेक ग्रामपंचायतीत पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने ग्रामपंचायतींची कामेही रखडली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

