ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा तळेरेत स्नेहमेळावा उत्साहात

ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा तळेरेत स्नेहमेळावा उत्साहात

Published on

swt1416.jpg
51201
तळेरेः येथे आयोजित स्नेहमेळाव्यात पंचक्रोशीतील ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. (छायाचित्र ः एन. पावसकर)

ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा
तळेरेत स्नेहमेळावा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १४ः येथे जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, शाखा तळेरेचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. यावेळी विविध सत्कार, मार्गदर्शन आणि विविध विषयांवर चर्चा असे उपक्रम पार पडले.
ज्येष्ठ नागरिकांना थोडासा विरंगुळा मिळावा यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघ दरवर्षी स्नेहमेळाव्याचे आयोजन करते. याचे उद्घाटन सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ सेवा निवृत्त पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर, सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मनोहर पालयेकर, सुरेश तळेकर, तळेरे शाखेचे अध्यक्ष सुरेश पाटणकर, राधाबाई गुरव, सुभाष नाईक, साळीस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर आदी उपस्थित होते. स्नेहमेळाव्याच्या सुरुवातीला रविकांत माळवदे, विनय पावसकर, विष्णू रांबाडे, मनमोहन सिंग यांच्यासह दिवंगत सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संविधानातील ज्येष्ठ नागरिकांची हक्क आणि कर्तव्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सूर्यकांत तळेकर, श्री. पालयेकर, चंद्रकांत झोरे यांनी मार्गदर्शन केले.
या सेवा संघाकडून पंचक्रोशीतील ७५ वर्षे पूर्ण केलेल्या मंदाकिनी दुधवडकर, रविंद्र पोकळे, रघुनाथ नेवरेकर, विष्णू रांबाडे, प्रभावती तळेकर, सुभाष नाईक, रघुनाथ तावडे, मारुती भोगले, शिल्पा नाईक या सर्वांचा शाल, श्रीफळ व पुष्पा देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रभाकर ताम्हणकर, प्रास्ताविक सुरेश पाटणकर तर आभार सचिव विजय सावंत यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com