

51204
मुणगे येथील भगवती मंदिरात
सोमवारपर्यत विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. १४ः येथील देवी भगवती मंदिरामध्ये काल (ता. १३) पासून शिमगोत्सवास उत्साहात सुरूवात झाली. सोमवारी (ता.१७)
धुळवड कार्यक्रमाने शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
येथील देवी भगवती मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाप्रमाणेच शिमगोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाची सुरूवात होळीने झाली. देवस्थान समितीचे पदाधिकारी, मानकरी, ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात बांबरवाडी येथून पोफळीच्या झाडाची होळी आणण्यात आली. आंब्याची पाने बांधून ती उभी करण्यात आली. यावेळी उद्योजक नंदकुमार मुणगेकर यांच्यावतीने त्यांना खाऊ व सरबतचे वाटप करण्यात आले. होळी उभी केल्यानंतर गावकरांमार्फत होळीजवळ कवळ पेटविण्यात आले. श्री. गुरव यांनी विधिवत पूजा केली. पुजेनंतर गावघराचे गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांची गाऱ्हाणी घालण्यात आली.
रात्री भगवती मंदिरामध्ये बांबरवाडी-कारिवणेवाडी यांचे रोंबट पार पडले. उद्या (ता.१५) रात्री बांबरवाडी-कारिवणेवाडी यांची रोबटे तसेच भंडारवाडी-लब्देवाडी-आडवाडी यांची रोबटे रोबंटे झाल्यानंतर कारीवणवाडी मंडळाचे दशावतारी नाटक, घुमट वाजवून घुमटाच्या तालावर नाच होणार आहे. १६ ला लब्देवाडी-भंडारवाडी, कारिवणेवाडी-बांबरवाडी यांची रोंबटे, लब्देवाडी मंडळाचा तमाशा, १७ ला दुपारी तीन वाजता बांबरवाडी मंडळ, हरिजनवाडी मंडळाचा तमाशा होणार आहे. त्यानंतर सर्व रोंबटे होळी जवळ जावून नवसफेड करणार. त्यानंतर आरती चालू असताच गुलाल उधळण्यात येतो. या धुळवडीच्या कार्यक्रमाने शिमगोत्सवाची सांगता होते. यावेळी होळीजवळ जमा होणारे नारळ व गुळ यांची शिरवणी करून उपस्थित ग्रामस्थांना वाटली जाते. भाविकानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्यावतीने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.