''बोट जरा रत्नागिरीकर वलवा'' गीताचे अनावरण

''बोट जरा रत्नागिरीकर वलवा'' गीताचे अनावरण

Published on

-rat१४p१.jpg-
२५N५१०७०
ः रत्नागिरी ः ‘बोट जरा रत्नागिरीकर वलवा’ गीताचे अनावरणाच्यावेळी नृत्य सादर करताना महिला.
------
‘बोट जरा रत्नागिरीकर वलवा’चे अनावरण
शिमगोत्सव : राधाकृष्ण मंदिरात कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ः गीतकार, संगीतकार अॅड. संदेश नागवेकर यांनी रत्नागिरीच्या शिमगोत्सवात लोकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी पुन्हा श्री एकवीरा आई व रत्नागिरीचे दैवत श्री भैरी यांच्यावर आधारित प्रथमच कोळीगीताची निर्मिती केली. ‘बोट जरा रत्नागिरीकर वलवा’ या गीताचे अनावरण बुधवारी (ता. १२) शहरातील राधाकृष्ण मंदिरात उत्साहात झाले.
बोट जरा रत्नागिरीकर वलवा या गीताचे अनावरण राधाकृष्ण देवस्थान, भैरी देवस्थान भगवती देवस्थानचे विश्वस्त सुधाकर मोंडकर, राजन मलुष्टे, विकास मयेकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दीर्घा राऊत आणि सहकारी यांनी सादर केलेल्या गीतातील हुबेहुब कोळीनृत्याला उपस्थित रसिकांनी प्रतिसाद दिला तसेच शीतल सकपाळ आणि सहकारी यांच्याही कोळीनृत्याला रसिकांनी दाद दिली. शिमगोत्सवात तयार झालेल्या कोळी गीतासाठी रत्नागिरीचे सुप्रसिद्ध बेवड्याक मान नायचे विनोदी कलाकर संदीप पावसकर यांची उपस्थिती लाभली होती. या वेळी संजय बने, प्रसिद्ध भजनीबुवा साईनाथ नागवेकर, दादा वाडेकर, सुदेशबुवा नागवेकर, निवती शिरगावकर, दिलीप नागवेकर, शंकर कीर, सुषमा नागवेकर, तृप्ती राऊत, अनुष्का नागवेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com