-पालखी नसलेला कोंढ्रण गावचा शिमगोत्सव

-पालखी नसलेला कोंढ्रण गावचा शिमगोत्सव
Published on

-rat१४p४.jpg
P२५N५१०८७
ःदेवरूख ः कोंढ्रण येथील जाखमाता
---
पालखी नसलेला कोंढ्रणचा शिमगोत्सव
जिल्ह्यातील एकमेव ओळख ; गणेशभट्ट सप्रे यांना वतन मिळालेला गाव
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. १४ ः रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगोत्सवाबद्दल सांगायचे झाले तर अनेक गावात शिमग्याच्या विविध परंपरा आहेत. पण संगमेश्वर तालुक्यातील कोंढ्रण गावातील शिमगोत्सव हा आगळावेगळा आहे. या गावात पालखी नाही. शिमगोत्सवात ग्रामदेवतांची पालखी सोहळा नसलेले एकमेव गाव आहे.
गणेशभट्ट सप्रे यांना वतन म्हणून दिलेला हा सुभा पाणथळ भाग असलेल्या कोंडात गणेशभट्ट सप्रे यांनी वसवला असल्याने गावचे नाव कोंढ्रण पडले. या गावची ग्रामदेवता जाखमाता देवी आहे. या देवीचे प्रमुख मानकरी सप्रे आहेत. देवीचे कुठलेही कार्य सप्रे कुटुंबातील व्यक्तीशिवाय पार पाडले जात नाही. त्याचप्रमाणे कोकणात शिकारीचे प्रस्थ प्रचंड आहे; परंतु कोंढ्रण गावात बार काढणे यालाही बंदी आहे.
निसर्गाच्या विविध छटा असलेल्या या गावात घनदाट जंगलात ग्रामदेवी मंदिर आहे. २५ ते ३० वर्षापूर्वी गवा, वाघ बिबट्या, साळींदर, कोल्हा, भेकरू, मोर, गिधाड आदी विविध प्राणी व पक्षी सहज वावरताना दिसायचे. हल्ली ते प्रमाण कमी आहे. गावात सप्रे मंडळींची अनेक घरे होती. सप्रे कुटुंबातील आताची ही आठवी पिढी आहे. सध्या गावात पाच ते सहा घर असून गावात कोणी कायम वास्तव्याला राहत नाहीत. काही सप्रे कुटुंबीय हे देवरूख व देवधामापूर गावात तर अनेकजण परगाव व राज्यात वास्तव्यास आहेत. तरी गावच्या व देवीच्या कार्यक्रमाला मानकरी म्हणून सप्रे कुटुंबीय गावात येऊन देवीचे कार्य करतात. गावातील पूर्वापार चालत आलेल्या प्रथापरंपरा जोपासताना सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन उत्सव करतात.
होळी उत्सवात जाखमाता देवीला रुपे लावून दागदागिन्यांनी सजवले जाते व देवीची विधीवत पूजाअर्चा केली जाते. त्यानंतर होम तयार केला जातो. तो सामायिक असतो. होळी गावातून तोडून गावकरी हातावरून वाजतगाजत नाचवत देवळात आणतात व देवीच्या प्रांगणात उत्साहात नाचवतात. त्यानंतर ती उभी करून तिची विधीवत पूजा केली जाते. देवळात देवीला प्रदान केलेले हातभेटीचे नारळ, ओट्या, पूर्ण झालेले नवस मानवले जातात व शिमगोत्सवाची सांगता होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com