

swt1420.jpg
51231
सावंतवाडीः येथे पत्रकार परिषदेत बोलताना परशुराम उपरकर.
पालकमंत्री राणेंनी इतिहास
समजून घ्यावाः उपरकर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ः पालकमंत्री नितेश राणे यांनी पहिल्यांदा इतिहास समजून घ्यावा. विनाकारण वाद निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये, अशी टिका ठाकरे शिवसेनेचे नेते परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेतून केली.
ते पुढे म्हणाले, ‘‘राणेंनी वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा जिल्ह्यातील आरोग्य प्रश्न, लोकांच्या प्रश्नांवर बोलावे. थोड्या दिवसांनी ते भाजप नेत्यांवरही बोलतील. शिवरायांनी त्यांच्या राज्यात सर्वधर्मीयांना समान न्याय दिला. शिवरायांबद्दल अभ्यास करूनच त्यांनी आपली मते व्यक्त करावीत. बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेला इतिहास वाचलेला नसेल, तर तो वाचावा. अधिक माहिती हवी असल्यास माझ्याकडून घ्यावी.’’ यावेळी शिवसैनिक शब्बीर मणियार, आशिष सुभेदार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.