तळेरेत महिलांसाठी उद्या विशेष कार्यक्रम
तळेरेत महिलांसाठी
उद्या विशेष कार्यक्रम
तळेरे ः नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) आणि प्रज्ञांगण तळेरेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.१६) दुपारी ३ वाजता आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रज्ञांगणने केले आहे. महिलांसाठी स्पर्धा आयोजित न करता आत्मविश्वास वाढवणारे, नाती दृढ करणारे आणि महिलांमधील सृजनशीलतेला नवा सन्मान मिळवून देणारे एक प्रतिभेला आणि भावनांना व्यक्त करण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यासाठी ३ उपक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये ‘माझी कलाकृती - माझी प्रेरणा’, ‘कनेक्टिंग जनरेशन-आई आणि मुलगी, सासू-सून, आजी आणि नात’ तर ‘माझ्या यशाचे आधारस्तंभ’ अशा तीन प्रकारात महिला सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी श्रावणी मदभावे, ऋतू महाडिक, साक्षी तळेकर यांच्याशी संपर्क साधावा. हा उपक्रम सर्व महिलांसाठी खुला असून आगाऊ नावनोंदणी आवश्यक आहे.
---------------
सावरकर मंडळातर्फे
होळी सण उत्साहात
कुडाळ ः दादर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा मंडळातर्फे गेली ४४ वर्षे होळी सणाची परंपरा आजही सातत्याने सुरू आहे. गुरुवारी (ता.१३) रात्री या ठिकाणी शिवराज्याभिषेक समिती किल्ले रायगड अध्यक्ष तथा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे सदस्य सुनील पवार यांच्या यांच्यासह अन्य मान्यवर, स्थानिक, चाकरमान्यांच्या उपस्थितीत होळी सण साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा मंडळाच्यावतीने पूजा अर्चा करून शास्त्रोक्त पद्धतीने हा धार्मिक सोहळा साजरा केला.
----------------
कणकवलीत सोमवारी
वेशभूषा स्पर्धा
कणकवली ः येथे ठाकरे शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता.१७) विविध कार्यक्रम व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना व त्यानंतर शिवरायांवर आधारित वेशभूषा स्पर्धा होणार आहे. वेशभूषा स्पर्धेसाठी प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५०००, ४०००, ३००० व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी १००० रुपये पारितोषिक देण्यात येईल. स्पर्धेत अधिक माहितीसाठी तेजस राणे, धीरज मेस्त्री, उद्धव पारकर यांच्याशी संपर्क साधावा. सर्वांनी उपस्थित राहवे, असे आवाहन रुपेश नार्वेकर यांनी केले.
---
‘रिपब्लिकन’ जिल्हा
उपाध्यक्षपदी कदम
कणकवली ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) जिल्हा उपाध्यक्ष पदावर नारिंग्रे येथील (सध्या रा. आडवली-मालवण) सतीश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अजित कदम यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र कदम यांना दिले.
.........................
सातोसेत आज
नाट्यप्रयोग
सातार्डा ः शिमगोत्सवानिमित्त सातोसे येथील श्री देवी माऊली नाट्यगंधतर्फे उद्या (ता.१६) आबासाहेब सरदेसाई नाट्य रंगमंच येथे रात्री १० वाजता ‘अवघी विठाई माझी’ हा दोन अंकी नाट्यप्रयोग होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

