

‘पांगरे’तील पाणीयोजनेचे काम थंडावले
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १४ ः तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत पांगरे बुद्रुक प्रादेशिक योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे तो उद्देश सफल होताना दिसत नाही. या साऱ्याकडे लक्ष वेधत नळपाणी योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करण्याबाबत आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाचे लक्ष वेधले.
तालुक्यातील पांगरे बुद्रुक धरणावर पांगरे बुद्रुक प्रादेशिक नळपाणी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेवरून परिसरातील कोंड्येतर्फे राजापूर, उन्हाळे, दोनिवडे, शेंबवणे, पांगरे, ससाळे, आंगले, पांगरे, फुपेरे, सोल्ये, हसोळ, जांभवली, पोटलेवाडी, तुळसवडे सोलिवडे, ताम्हाणे पहिलीवाडी व धनगरवाडी आदी गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. या योजनेला मंजूर होऊन जवळपास चार वर्षे झाली असली तरीही या योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्याबाबत संबंधित गावांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गंत राबवण्यात येत असलेल्या पांगरे बुद्रुक प्रादेशिक नळपाणी योजनेचे काम जलदगतीने व्हावे, या उद्देशाने आमदार खोत यांनी औचित्याच्या मुद्द्यांद्वारे शासनाचे लक्ष वेधले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.