दापोली  ः पाणीटंचाईच्या काळातही दापोलीत लाखो लिटर वाया

दापोली ः पाणीटंचाईच्या काळातही दापोलीत लाखो लिटर वाया

Published on

rat14p33.jpg
51240
दापोलीः मुख्य रस्त्यावर पाण्याच्या टाकीसमोर पाईपलाईन फुटल्याने गळती लागली आहे.

जलवाहिनीमधून दापोलीत लाखो लिटर पाणी वाया
काळकाईकोंड, उसी पार्क येथे गळती; नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १४ः दापोली शहरातील काळकाईकोंड व उसी पार्क येथे जलवाहिनीमधून लाखो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दापोली शहराला कोडजाई व नारगोली येथे असलेल्या नळपाणी योजनेतून आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा केला जातो. एप्रिलच्या मध्यावर कोडजाईतील पाणीपुरवठा ठप्प होतो. त्यानंतर नारगोली येथील योजनेवर दापोलीकरांना भरवसा ठेवावा लागतो. दापोलीकरांना दिवसाला २० लाख लिटर पाण्याची गरज आहे. सध्या दापोलीमध्ये २ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिलच्या १५ तारखेनंतर त्यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. तर मे महिन्यात पाण्याच्या साठ्याचा अंदाज घेऊन पाणीपुरवठा करावा लागतो.
दापोलीपासून सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या सोंडेघर येथील धरणातून ९९ कोटी रुपये खर्च करून नवीन नळपाणी योजना आणण्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नियोजन केले असून, काही दिवसांपूर्वी दापोलीत झालेल्या कार्यक्रमात ही नळपाणी योजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी दापोली नगरपंचायतीमधून पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. सुमारे १५ दिवसात या कामाचे भूमीपूजन होण्याची शक्यता असून, दापोलीकरांना पुढील वर्षभरात सोंडेघर येथून पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आहे.
शहरात टंचाई असताना काळकाईकोंड येथील पाण्याच्या टाकीबाहेरील मुख्य मार्गानजीक पाईपलाईनमधून दिवसाला लाखो लिटर पाणी वाया जात असून, उसी पार्क येथेही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करताना नगरपंचायत प्रशासनाने पाणी वाया जाऊ नये यासाठी तत्पर राहण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.

कोट
बाराही महिने एक दिवसआड करून पाणी येत आहे. पाणीपट्टी मात्र तेवढीच घेतली जाते तसेच थोड्याच दिवसात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. अशातच नगरपंचायतीच्या या अशा भोंगळ कारभारामुळे हे एवढं लाखो लिटर पाणी वाया जात आहे. नगरपंचायतीने वेळीच लक्ष देऊन ही गळती बंद करणे नितांत गरजेचे आहे.
- सलीम रखांगे, ग्रामस्थ, काळकाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com