रत्नागिरी ःसमाजात अफवा पसरवून वातावरण बिघडवू नका
समाजात अफवा पसरवून वातावरण बिघडवू नका
पोलिसांचे आवाहन वाहन ; सोशल मीडियावर पोलिसांचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता १४ः सोशल मीडिया व वृत्तपत्रांमध्ये आक्षेपार्ह दृश्ये, फोटो, व्हिडिओ तसेच अफवा न पसरवण्याबाबत रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. समाजातील सर्व स्तरातील कोणत्याही प्रकारच्या समाजमाध्यमांवर ऐतिहासिक व थोर पुरुष, घटनात्मक उच्च पदावरील सन्माननीय व्यक्ती, राजकीय व्यक्ती अथवा इतर समाजातील व्यक्तींच्या संदर्भात भावना दुखावतील, अशा अनुषंगाने आक्षेपार्ह पोस्ट करु नयेत तसेच स्टेटस ठेवू नयेत. सोशल मीडियावर सायबर पोलिस ठाणे रत्नागिरीतर्फे २४ तास लक्ष ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियाद्वारे कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश अगर आक्षेपार्ह संदेश, व्हिडिओ प्रसारित केल्यास रत्नागिरी पोलिसदलाकडून कडक कारवाई करण्यात येईल.
कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अथवा बळी पडू नये तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसअॅप अथवा युट्यूब या समाजमाध्यमांवर अशा आक्षेपार्ह पोस्ट, स्टेटस करणाऱ्या व्यक्तींचे रेकॉर्ड तयार होऊन त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे अशी समाजमाध्यमे वापरणारे तरुणवर्ग व इतर यांनी आक्षेपार्ह पोस्ट करू नये व आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड करू नये अथवा लाईक करू नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

