विनयभंग प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला

विनयभंग प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
Published on

विनयभंग प्रकरणी
जामीन अर्ज फेटाळला
रत्नागिरीः कोकण रेल्वेच्या पॅसेंजर गाडीत तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या संशयिताचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. इफराज इतिखान अलजी (रा. कुरधुंडा खुर्द मोहल्ला, संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. इफराज हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून जामिनासाठी त्याने रत्नागिरी सत्र न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी इफराज याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. सरकारी पक्षाच्या वकिलांना साहाय्य म्हणून पीडितेच्यावतीने अॅड. मनिष नलावडे यांनी युक्तीवाद केला. पीडित तरुणी ही सकाळी साडेपाच वाजता रत्नागिरी दिवा पॅसेंजरने खेड येथे जात होती. सकाळी गाडीला जास्त प्रवासी नसल्याने ती बसलेल्या गाडीचा डबा रिकामाच होता. सकाळी सव्वापाचच्या सुमारास संशयिताने तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित तरुणीने रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती.
----
वेरॉन कंपनीत
केबलची चोरी
रत्नागिरीः शहरातील मिरजोळे-एमआयडीसी येथील वेरॉन कंपनीच्या पीडीसी डिपार्टमेंट विभागातील ७८ हजार ९९० रुपयांची केबलची अनोळखी व्यक्तीने चोरी केली. ग्रामीण पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ८ ते ९ मार्च २०२५ ला दुपारी दोनच्या सुमारास मिरजोळे एमआयडीसी येथील वेरॉन अॅल्युमिनियम प्रा. लि. कंपनी येथे निदर्शनास आली. या प्रकरणी राजू महिपती सोनवणे (४२) यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.
---
हद्दपारीच्या आदेशाचे
उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरीः न्यायालयाच्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार तालुक्यातील करबुडे येथे आढळला. ग्रामीण पोलिसात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वप्नील बाळू पाचकुडे (रा. मावळती पाचकुडेवाडी, करबुडे, रत्नागिरी) असे गुन्हेगाराचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. १३) सायंकाळी सातच्या सुमारास मावळती पाचकुडेवाडी, करबुडे येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील पाचकुडे यास उपविभागीय दंडाधिकारी, न्यायालयाचे आदेशानुसार २७ डिसेंबर २०२४ पासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षाकरिता हद्दपारीचे आदेश देण्यात आले होते; मात्र संशयित गुन्हेगार १ जानेवारीला २०२५ ला स्वप्नील पाचकुडे हा तालुक्यातील करबुडे येथे सापडला. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण कोकरे यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.
........
पुण्यातून रत्नागिरीत आलेल्या
वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः पुण्यातून रत्नागिरीत खासगी वाहनाने दाखल झालेल्या वृद्धाला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. कंचनकांती मनोजकुमारघोष दस्तदार (वय ७३, रा. परगाना, कलकत्ता, पश्चिम बंगाल) अस मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १४) सकाळी साडेसातच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
.........
51250

चिपळुणातील तरुणाचा
अपघाती मृत्यू
चिपळूणः शहरातील लाईफकेअर हॉस्पिटल परिसरात बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. शिमगोत्सवाच्या कार्यक्रमाला जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. साहिल जयंत कासार (२५, खेंड-कांगणेवाडी) असे या तरुणाचे नाव आहे. साहील व त्याचे मित्र वेगवेगळ्या दुचाकींवरून शिमगोत्सवाच्या कार्यक्रमाला जात होते. या वेळी चिपळूण गुहागर बायपास मार्गावरील रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी मोरीत घुसली. यातच त्याचा मृत्यू झाला. याची माहिती कांगणेवाडी येथील त्याच्या मित्रांनी दिल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची पोलिसात नोंद केली आहे. साहिल याच्यावर गुरूवारी रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे वडील जयंत कासार हे पालिकेत बांधकाम विभागात शिपाई म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com