कणकवली शहरात आढळला अनोळखी तरूणाचा मृतदेह

कणकवली शहरात आढळला
अनोळखी तरूणाचा मृतदेह
Published on

51278

कणकवली शहरात आढळला
अनोळखी तरूणाचा मृतदेह

कणकवली, ता.१४ : शहरातील महापुरूष कॉम्प्लेक्‍सच्या मागील बाजूस अनोळखी तरूणाचा मृतदेह आज आढळला. या मृतदेहाबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. परप्रांतीय कामगाराचा हा मृतदेह असावा अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली. येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यू अशी नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बाजारपेठेतील महापुरूष कॉम्प्लेक्स मधील व्यावसायिक सचिन चव्हाण यांनी सकाळी नऊच्या सुमारास दुकान उघडले. त्‍यानंतर त्‍यांना काहीतरी कुजल्‍याचा वास येत होता. सकाळी अकराच्या सुमारास दुकानातील कामगारांनी इमारतीच्या मागील बाजूस जाऊन पाहिले असता अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला. त्‍यानंतर याबाबतची माहिती कणकवली पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक मारुती जगताप, उपनिरीक्षक शरद देठे, सागर शेगडे, हवालदार पांडुरंग पांढरे, भूषण सुतार दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्‍हा रूग्‍णालयात पाठवला. तीन दिवसांपूर्वी तरूणाचा मृत्‍यू झाला असावा अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली. मृत तरूणाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृतदेहाच्या अंगावर काळ्या रंगाचा फुल टी शर्ट, काळ्या रंगाची पँट आहे. याबाबत कुणाला माहिती असल्‍यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com