

51786
आमदार राणेंचा वाढदिवस
कुडाळात विविध उपक्रमांनी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. येथील बसस्थानक येथे प्रवाशांना मिठाई वाटप, महिला व बाल रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप तसेच नगरपंचायतीमधील सफाई कर्मचाऱ्यांना साखर व रवा असे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, गणेश भोगटे, रेवती राणे, शिवसेना शहर प्रमुख रोहित भोगटे, चंदन कांबळी, राकेश वर्दम, श्रुती वर्दम, प्रसन्न गंगावणे, नीलेश शिरसाट, अविनाश पाटील तसेच मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष शिरवलकर तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत बसस्थानकावर प्रवाशांना मिठाई वाटप केले. त्याबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिवसेनेने घेतलेल्या समाजोपयोगी कार्यक्रमांबाबत जनतेमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.