‘संच मान्यता’ आदेश रद्द करा

‘संच मान्यता’ आदेश रद्द करा
Published on

51796

‘संच मान्यता’ आदेश रद्द करा

प्राथमिक शिक्षकांची मागणी ः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १७ ः संच मान्यतेचा शासन निर्णय लागू झाल्यास शिक्षण क्षेत्रात खळबळ माजणार असल्याने, गोरगरीब व वंचितांचे शिक्षण बंद करणारा जाचक आदेश रद्द करावा, या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, राजन कोरगावकर, चंद्रसेन पाताडे, नामदेव जांभवडेकर आदींसह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक सहभागी झाले होते.
या संचमान्यतेचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात जाणवणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९९४ शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. यामध्ये ६ मुख्याध्यापक, ८२७ पदवीधर तर १६१ उपशिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे एक तृतीयांश शिक्षक कमी होणार आहेत. याचा सिंधुदुर्गच्या शिक्षण क्षेत्रावर विपरित परिणाम जाणवणार आहे. सहावी व सातवीच्या जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांना शिक्षकच मिळणार नाही. एक ते सातच्या शाळेवर दोन शिक्षक राहणार आहेत. याचा परिणाम जिल्ह्याच्या भावी पिढीवर होणार आहे. त्यामुळे आज शिक्षक समितीच्या वतीने नवीन संचमान्यता शासन निर्णयाच्या विरोधात आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी धरणे आंदोलन केले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या धोरणाविरोधात तसेच १५ मार्च २०२४ च्या अन्यायकारक संच मान्यता आदेशाविरोधात संताप व्यक्त केला. ही आंदोलनाची सुरुवात असून ही चळवळ अधिक प्रभावीपणे उभारली जाईल आणि शासन जोपर्यंत हा निर्णय रद्द करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. यापुढे अधिक तीव्रतेने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com