प्रा. महाडीक यांनी समाजकारण जपले

प्रा. महाडीक यांनी समाजकारण जपले
Published on

swt181.jpg
51922
तळेरेः वामनराव महाडिक जन्म शताब्दी सोहळ्यात बोलताना प्रमुख अतिथी डॉ. बाळकृष्ण लळीत. व्यासपीठावर डॉ. प्रकाश बावधनकर, रमाकांत वरुणकर, अरविंद महाडिक व इतर मान्यवर. (छायाचित्र : महाकाली फोटो स्टुडिओ)

वामनराव महाडीक यांनी समाजकारण जपले
डॉ. बाळकृष्ण लळीतः तळेरे महाविद्यालयात जन्मशताब्दी सोहळा
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १८ः वामनराव महाडिक हे ज्ञानसाधक होते. मुळातच ते शिक्षक होते. राजकारणापेक्षा त्यांनी समाजकारण केले. इथल्या ग्रामीण भागातील मुलांचा विचार करून शिक्षणाची चळवळ उभी केली. चांगला अभ्यास केला तर ज्ञान मिळेल आणि त्यामुळे आर्थिक, सामाजिक प्रगती होईल, असे प्रतिपादन वामनराव (आप्पा) महाडिक जन्मशताब्दी सोहळ्याचे प्रमुख अतिथी चांदमल तारचंद बोरा महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी केले.
येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे संस्थापक वामनराव महाडिक यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन प्रशालेत सोमवारी करण्यात आले. डॉ. प्रकाश बावधनकर, रमाकांत वरुणकर, अरविंद महाडिक, डॉ. चित्रा ठाकूर, हेमांगी महाडिक, राधा कडुसकर, घनःश्याम कडूसकर, शारदा भस्मे, विजय भस्मे, कश्मिरा महाडीक, प्रेषित महाडीक, संदीप कोळेकर, बाप्पी मांजरेकर, दिलीप तळेकर, नाधवडे मुख्याध्यापक संजय पाताडे, प्रा. अविनाश मांजरेकर आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम प्रशालेच्या एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनमध्ये पार पडला.
डॉ. बावधनकर यांनी, महाराष्ट्राचा इतिहास ज्यांच्या नावाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. वामनराव महाडिक. विद्यार्थी आणि शिक्षक कसा असावा? हे देखील त्यांचे व्यक्तिमत्व अनुभवल्यानंतर लक्षात येते, असे सांगितले.
यावेळी जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त सुरू केलेल्या प्रिं. वामनराव महाडिक आदर्श शिक्षक पुरस्कार नाधवडे प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक संदीप कोळेकर यांना प्रदान करण्यात आला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम ५,५५५ रुपये देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेतील विजेत्या मुलांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरविले. अरविंद महाडिक, डॉ. बावधनकर, डॉ. लळीत, प्रा. मांजरेकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. रमाकांत वरुणकर, राजू जठार, संदीप कोळेकर, उदय दुधवडकर, दिलीप तळेकर, अरविंद महाडिक आणि दादा खटावकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुचिता सुर्वे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. चित्रा ठाकूर यांनी केले.

चौकट
विशेष सत्कार
या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त संस्थेला सातत्याने सहकार्य करणारे दादा खटावकर, पत्रकार उदय दुधवडकर, मुख्याध्यापक महेंद्र पावसकर आणि संस्थेला जमीन दान केलेल्या देणगीदार यांचे नातेवाईक सुधीर ढेकणे, रोहित आणि हेमंत महाडिक, दिलीप तळेकर, आरती घाडी, उमेश कदम, हिरोजी तळेकर, रमाकांत वरुणकर यांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com