

टेक्नो..........लोगो
(१२ मार्च टुडे ३)
पौराणिक आख्यायिकेनुसार, भक्त पुंडलिकाने पांडुरंगाला उभे राहण्यासाठी दिलेली वीट व त्यावर उभे ठाकलेले विठ्ठल यामध्ये जेवढी पुंडलिकची स्वतःच्या निर्मितीबद्दल खात्री तेवढाच भगवंताचा स्वतःच्या भक्तांवरील विश्वास महत्वाचा हे नाकारून चालणार नाही. बांधकाम व्यवसायात एखादी इमारत मग ते छोटेखानी घर असो किंवा मोठी इमारत असो त्या ठिकाणी ती पुंडलिकाने दिलेली खात्री खूप महत्वाची ठरते. आपण वापरत असलेला कच्चा माल (उदा. सिमेंट, स्टील, वाळू, खडी, तयार होणारे काँक्रिट इ.) यामधील काही कच्चा माल सर्व गुणवत्ता पारखून मगच बाजारामध्ये येतो व आपण वापरतो; पण बांधकामासाठी वापरात येणारा माल वापरून त्यापासून होणारी निर्मिती ही पूर्णपणे माणसाच्या कौशल्यावर अवलंबून असल्यामुळे तयार होणाऱ्या मालाची गुणवत्ता तपासणे तेवढेच अनिवार्य ठरते.
- rat१८p१२.jpg-
P25N51933
--राहुल केळकर
---
पांडुरंगाच्या पायाखालील वीट
बांधकामाच्यादृष्टीने महत्वाची बाब म्हणजे ज्या जागेवर आपण इमारत बांधकाम योजले आहे त्या जागेमधील माती परीक्षण. बांधकामासाठी आपल्या जागेतील जमिनीखालील थर वरील इमारतीचा भार पेलण्यासाठी सक्षम आहे का? हे यामधून कळते. शेतीसाठी केले जाणारे मृदा परीक्षण जेवढे आवश्यक तेवढेच बांधकामासाठी केले जाणारे माती परीक्षण गरजेचे असते. अर्थात, त्यासाठीची परिमाणे व टेस्टिंग प्रोसेस वेगळी असते. हल्लीच्या यांत्रिकीकरणाच्या युगात पूर्णपणे मशिनवर विसंबून न राहता विशिष्ट टप्प्यावर गुणवत्ता पारखून घ्यावीच लागते. यासाठी भारतीय मानक ब्युरोने काही परिमाणे ठरवून दिली आहेत. त्यांचा पाठपुरावा व आचरण करणे हे ठोस व टिकाऊ बांधकामाचे द्योतक ठरते.
‘घर पाहावे बांधून’ ऐवजी ‘घर बांधावे पारखून’ असे न केल्यास बांधकामानंतर येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण यात पैसा व वेळ दोन्ही खर्ची पडतात. काही गोष्टी मालक म्हणून आपण व बांधकाम व्यावसायिक यांच्या संयोगाने आपण साध्य करू शकतो. आपली सदनिका किंवा घर पर्यावरणपूरक व आवाक्यातील खर्चामध्ये कसे होईल, याचीही पूर्तता या सर्वांमधून साध्य होऊ शकते.
सध्या बाजारपेठेमध्ये परंपरागत बांधकाम सामग्रीला आधुनिकतेची जोड देऊन खूप पर्याय उपलब्ध आहेत. असे पर्याय योग्य परीक्षण करून वापरले तर परंपरागत स्रोत यांच्यावर येणारा ताण एक सुजाण नागरिक म्हणून आपण कमी करू शकतो. असे पर्याय व त्यांचा परीक्षणानंतर वापर ही प्रक्रिया औद्योगिक क्षेत्रातील बांधकामामध्ये राबवली जाते, किंबहुना त्यांना अनिवार्य असते. सर्वसामान्य वापराकरिता या सर्वांपासून काही प्रमाणात अनभिज्ञ असतो किंवा वेळेअभावी दुसऱ्याच्या सांगण्यावर अवलंबून असतो. निर्माण होणारी वास्तू कमीत कमी आपल्या पिढीला तरी समाधानाने वापरायोग्य राहावी असे वाटत असल्यास हे परीक्षणाचे कष्ट घ्यायला नको का?
कच्च्या मालाचे परीक्षण व त्यासाठी होणारा खर्च हा बांधकामाच्या खर्चाच्या सुमारे ५-७ टक्के येतो, असं भारतीय मानक ब्युरो म्हणतो. यामध्ये आपण थोडी स्वायत्तता घेऊन ३-४ टक्केपर्यंत जर परीक्षणावर खर्च केला तरी ती विटेची खात्री आपण स्वतःच स्वतःला देऊ शकतो. याचा फायदा काही परवानग्या, इमारतीचा विमा, विक्री इ. साठी होतो. असे परीक्षणाचे अधिकार सरकारमान्य लॅबोरेटरीज, नामांकित इंजिनिरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज इ. यांना असतात. त्यासाठी लागणारी यंत्रणा, सामग्री यांचे सर्वेक्षण विशिष्ट कालावधी ने करणे या संस्थांना बंधनकारक असते.
घरडा कॉलेजमधील सिव्हिल डिपार्टमेंटमधील अद्ययावत लॅब व आवश्यक क्वालिफाइड स्टाफ यांचे सहयोगाने हे कार्य गेली १५ वर्षे अविरत चालू आहे. कोकण रेल्वे, जिल्हा परिषद, लोटे-परशुराम औद्योगिक क्षेत्रातील नामांकित कंपन्या, चिपळूण व खेडमधील नामांकित बिल्डर व त्यांची क्रीडाई असोसिएशन यांच्यासाठी सदर कार्य वाजवी दरामध्ये सेवेत आहे. या निमित्ताने बांधकामक्षेत्रामध्ये छोट्याशा विटेएवढे योगदान देता येते याचा स्थापत्य अभियांत्रिकी विभाग सार्थ अभिमान बाळगून आहे.
(लेखक घरडा कॉलेज, लवेलमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागात लॅब असिस्टंट आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.